नागपूर : महाराष्ट्र कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे, तर नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली पुणे पोलीस आयुक्तपदी करण्यात आली.

गेल्या महिनाभरापासून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. हिवाळी अधिवेशनामुळे या बदल्या लांबल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात गृह विभागाने राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यापूर्वी नागपुरातून उपायुक्त राकेश ओला यांची बदली नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली, तर ग्रामीणचे अधीक्ष शैलेश बलकवडे यांची बदली गडचिरोलीच्या अधीक्षकपदी झाली आहे. त्यानंतर उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, एस. चैतन्य, रवींद्र परदेशी, स्मार्तना पाटील आणि सुहास बावचे यांची बदली झाली. पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांची बदली पुणे आणि पुण्याहून रवींद्र कदम हे नागपुरात येत आहेत. त्यानंतर सोमवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदांच्या बदलीची यादी प्रसिद्ध झाली. यात पुणे येथील कारागृह विभागाचे महानिरीक्षक व अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची बदली नागपूर पोलीस आयुकतपदी करण्यात आली, तर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांची बदली पुणे पोलीस आयुक्तपदी करण्यात आली.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

डॉ. उपाध्याय यांनी यापूर्वी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक आणि नागपूरच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी काम  केले आहे. त्यामुळे त्यांना शहरातील परिस्थितीचा बराच अभ्यास आहे. बुधवारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

‘‘सर्वसामान्य लोकांच्या मनात पोलिसांबद्दल असलेली प्रतिमा अधिक सकारात्मक व वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पदभार स्वीकारल्यानंतर सर्वाशी चर्चा करून स्थानिक गुन्हेगारीचे स्वरूप व इतर बाबी लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.’’

– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नवे पोलीस आयुक्त.