२४ तासांत १३ मृत्यू; नवीन ३५७ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचा आलेख खाली जाण्याचा क्रम रविवारीही कायम होता. दिवसभरात येथे १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर ३५७ नवीन रुग्णांची भर नोंदवण्यात आली.

शहरात रविवारी ४ हजार ७३, ग्रामीणला २ हजार ७०८ असे एकूण जिल्ह्य़ात ६ हजार ७८१ सक्रिय उपचाराधीन करोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील १ हजार ९१६ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर ४ हजार ८६५ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. दरम्यान, २४ तासांत शहरात दगावलेल्या रुग्णांमध्ये ५, ग्रामीणचे ३, जिल्ह्य़ाबाहेरील ५ अशा एकूण जिल्ह्य़ातील १३ रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या ५ हजार २३७, ग्रामीण २ हजार २८७, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३६८ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार ८९२ रुग्णांवर पोहचली. दरम्यान दिवसभरात शहरात २२०, ग्रामीणला १३२, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण जिल्ह्य़ात ३५७ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ३० हजार ८६६, ग्रामीण १ लाख ४१ हजार ८७०, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ५५० अशा एकूण जिल्ह्य़ातील ४ लाख ७४ हजार २८६ रुग्णांवर पोहचली आहे.

विदर्भात करोना बळींची संख्या पन्नासच्या टप्प्यात!

२४ तासांत ५२ मृत्यू; नवीन २,१४२ रुग्णांची भर

विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ांत २४ तासांत ५२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर नवीन २,१४२ रुग्णांची भर पडली आहे. अनेक आठवडय़ांतर येथील मृत्यूसंख्या पन्नासच्या टप्प्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भात  २२ मे रोजी १३५ मृत्यू, २३ मे रोजी ११६ मृत्यू, २४ मे रोजी १०८ मृत्यू, २५ मे रोजी १०४, २६ मे रोजी ८६, २७ मे रोजी ८०, २८ मे रोजी ६९ मृत्यू, २९ मे ६८ मृत्यू झाले होते. ही संख्या रविवारी आणखी कमी होत ५२ रुग्णांवर आली. रविवारी २४ तासांत नागपूर शहरात ५, ग्रामीणचे ३, जिल्ह्य़ाबाहेरील ५ अशा एकूण जिल्ह्य़ातील १३ रुग्णांचा समावेश होता. नागपूर जिल्ह्य़ात दिवसभरात ३५७ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील २५ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत १० मृत्यू तर ४०७ नवीन रुग्ण आढळले, चंद्रपूरला २ मृत्यू तर २९८ रुग्ण, गडचिरोलीत ४ मृत्यू तर ६५ रुग्ण, यवतमाळला ३ मृत्यू तर १२३ रुग्ण, भंडाऱ्यात २ मृत्यू तर १०७ रुग्ण, गोंदियात ३ मृत्यू तर ७५ रुग्ण, वाशीमला २ मृत्यू तर १०८ रुग्ण, अकोल्यात १ मृत्यू तर २३९ रुग्ण, बुलढाण्यात ८ मृत्यू तर १२० रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ४ मृत्यू तर २४३ नवीन रुग्ण आढळले.

जवळपास तिप्पट व्यक्ती करोनामुक्त

शहरात दिवसभरात ५६७, ग्रामीणला ४७४ असे जिल्ह्य़ात एकूण १ हजार ४१ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख २२ हजार १४२, ग्रामीणची १ लाख ३६ हजार ४७१ व्यक्तींवर पोहचली आहे. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९६.७० टक्के आहे.

चाचण्यांची संख्या १४ हजारावर

शहरात दिवसभरात १० हजार ३९१, ग्रामीणला ३ हजार ६४६ असे एकूण जिल्ह्य़ांत १४ हजार ३७ संशयितांनी चाचणीसाठी नमुने दिले. ही संख्या शनिवारी १३ हजार ४४१ इतकी होती.