२४ तासांत ६,९५६ नवीन रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ७९ रुग्ण करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर ६ हजार ९५६ नवीन रुग्णांची भर पडली.

दगावलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४०, ग्रामीण ३३, जिल्ह्य़ाबाहेरील ६ अशा एकूण ७९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ८२८, ग्रामीण १ हजार ४१२, जिल्ह्य़ाबाहेरील ९४८ अशी एकूण ६ हजार १८८ रुग्णांवर पोहोचली आहे.  शहरात दिवसभऱ्यात ४ हजार ५०३, ग्रामीण २ हजार ४४७, जिल्ह्य़ाबाहेरील ६ असे एकूण ६ हजार ९५६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३५ हजार ६५६, ग्रामीण ७९ हजार २१३ अशी एकूण ३ लाख १५ हजार ९९९ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभऱ्यात शहरात १४ हजार ६०५, ग्रामीण १४ हजार ४४८ अशा एकूण २९ हजार ५३  चाचण्या झाल्या. हा चाचण्यांचा उच्चांक आहे.

विदर्भात एकाच दिवसात २३६ बळी!

विदर्भात करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून गेल्या २४ तासांत येथील अकरा जिल्ह्य़ांत तब्बल २३६ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभऱ्यात १६ हजार ४१ नवीन रुग्णांची भर पडली. नागपुरात दिवसभरात ४०, ग्रामीण ३३, जिल्ह्य़ाबाहेरील ६, असे एकूण   ७९ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर येथे ६ हजार ९५६ रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात २३ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार २४० रुग्ण आढळले. अमरावतीत ११ मृत्यू तर ७९९ नवीन रुग्ण आढळले. चंद्रपूरला २३ मृत्यू तर १ हजार ५९३ रुग्ण आढळले. गडचिरोलीत १५ मृत्यू तर ४६६ रुग्ण आढळले. गोंदियात २२ मृत्यू तर ८८५ रुग्ण आढळले. यवतमाळला २६ मृत्यू तर १ हजार ४८ रुग्ण आढळले. वाशीमला ८ मृत्यू तर ६२० रुग्ण आढळले. अकोल्यात १० मृत्यू तर ६५६ रुग्ण आढळले. बुलढाण्यात ६ मृत्यू तर १ हजार २८५ रुग्ण आढळले. वर्धा जिल्ह्य़ात १३ मृत्यू तर ४९३ रुग्ण आढळले. विदर्भात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ३३.४७ टक्के मृत्यूंचा समावेश आहे.

दंदे रुग्णालयाला पाच व्हेंटिलेटर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून नागपूरला नवीन व्हेंटिलेटर मिळाले आहेत. यातील  पाच व्हेंटिलेटर रामनगरातील दंदे  रुग्णालयाला  गडकरी यांच्या हस्ते देण्यात आले. चेन्नईच्या फिनिक्स मेडिकल सिस्टिम कंपनीकडून गडकरींनी सामाजिक दातृत्व निधीतून  ५०० व्हेंटिलेटर्स मागवले.  यातील  पाच व्हेंटिलेटर दंदे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. पिनाक दंदे यांना सोपविण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी , भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके उपस्थित होते.

सेवानिवृत्त प्राध्यापकाचा उपचाराअभावी मृत्यू

करोना रुग्णांना रुग्णालयात खाटा, प्राणवायू, औषध मिळत नसल्याने अनेकांचा जीव उपचाराअभावीच जात आहे. शनिवारीही टेका नाका परिसरातील नालंदा नगर परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकांना करोनाची लागण झाल्याचे समजले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांकडून रुग्णालयांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. पण, कोणत्याच रुग्णालयात त्यांना प्राणवायूची खाट उपलब्ध न झाल्याने त्यांचा उपचाराअभावी कारमध्येच मृत्यू झाला.

रुग्णालयांत दाखल रुग्णांची संख्या ८ हजार पार

शहरात ४० हजार १००, ग्रामीणला २६ हजार १०८ असे एकूण जिल्ह्य़ात ६६ हजार २०८ उपचाराधिन रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ८ हजार १७ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये   तर ५८ हजार १९१ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

उपचाराविना मृत्यू, पोलिसांकडे तक्रार

करोना बाधित महिलेला उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. यासाठी दोषी असणाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करणारे निवदेन विदर्भ जनआंदोलन समितीचे प्रशांत जयकु मार यांनी  शांतीनगर पोलीस ठाण्यात दिले आहे. प्रशांत जयकु मार हे विदर्भ राज्य जनआंदोलन समितीच्या वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. यांच्या आई ललिता यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांना  प्राणवायूची गरज होती. मात्र कु ठल्याच इस्पितळात तशी खाट  उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचा घरीच मृत्यू झाला. एखाद्या रुग्णाला उपचार न मिळणे आणि त्याचा मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. पण, ती ते योग्य रितीने पार पाडत नाही. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. ललिता जयकु मार यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेले के ंद्र व राज्य सरकार तसेच महापालिके चे पदाधिकारी व अधिकारी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार प्रशांत जयकु मार यांनी के ली आहे.

पाच हजार करोनामुक्त

शहरात दिवसभऱ्यात ३ हजार ८८०, ग्रामीण १ हजार १२४ असे एकूण ५ हजार ४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या वाढून १ लाख ९१ हजार ४५४, ग्रामीण ५२ हजार १६९ अशी एकूण २ लाख ४३ हजार ६०३ व्यक्तींवर पोहोचली आहे.  करोनामुक्तांचे प्रमाण  ७७.०८ टक्यांवर घसरले आहे.

 

झोननिहाय (२४ तासांत) करोना रुग्ण व मृत्यू

   झोन                        रुग्ण                                मृत्यू

लक्ष्मीनगर                        ६४८                                ४

धरमपेठ                             ४७६                              ५

हनुमानगर                           ६९९                               ४

धंतोली                                 ५६६                               ४

नेहरूनगर                           ५९१                               ५

गांधीबाग                           २१२                               ३

सतरंजीपुरा                         ११८                               १

लकडगंज                            २५८                              ४

आशीनगर                          २८८                              ५

मंगळवारी                          ६४७                             ५

एकूण                             ४५०३                          ४०