08 August 2020

News Flash

‘डब्बा’तील आरोपी लद्दडवर कारागृह मेहेरबान!

१२ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेने डब्बा व्यापाऱ्यांच्या शहरातील दहा प्रतिष्ठानांवर छापे टाकले.

कारागृहाचे रुग्णालय असताना तापाच्या उपचारासाठी मेडिकलमध्ये रवानगी

दहा हजार कोटींवर गैरव्यवहाराच्या ‘डब्बा’ प्रकरणातील आरोपी कुशल किशोर लद्दड याच्यावर मध्यवर्ती कारागृह प्रशासन जास्तच मेहेरबान झालेले दिसत आहे. साध्या तापाचे कारण देऊन कारागृह प्रशासनाने त्याला उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हलविले आहे. विशेष म्हणजे लद्दड याची प्रकृती ठणठणीत असून चार दिवसांपासून तो मेडिकलमध्ये निव्वळ वेळ घालवतो आहे.

१२ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेने डब्बा व्यापाऱ्यांच्या शहरातील दहा प्रतिष्ठानांवर छापे टाकले. या कारवाईत डब्बा ट्रेडिंगमध्ये गुंतलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांचा बुरखा फाटला. यात मोठय़ा प्रमाणात दस्तावेज, संगणक आणि इतर साहित्य जप्त केले गेले. या कारवाईत ८ प्रकरणात २१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून दहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमेश छोटेलाल पात्रे रा. वैशालीनगर, गोविंद भंवरलाल सारडा रा. कॅनाल रोड, कुशल किशोर लद्दड रा. रामदासपेठ, प्रितेश सुरेशकुमार लखोटिया रा. २०१, शंकरनगर, अश्विन मधुकर बोरीकर रा. दुर्गावतीनगर, विकास लक्ष्मीनारायण कुबडे रा. पाचपावली, स्वप्निल विजयराव पराते रा. शिवाजीनगर, विजय चंदुलाल गोकलानी रा. क्वेटा कॉलनी, निरज ओमप्रकाश अग्रवाल आणि निमीत किरीट मेहता यांचा समावेश आहे.

सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडीतील काही आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर अद्याप निर्णय होणे बाकी आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आरोपींचे १० हजारांवर मोबाईल कॉल्स रेकॉर्डिग तपासले आहेत. त्यावरून दहा हजार कोटींवर गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अशात कारागृहातील आरोपी कारागृहाबाहेर पडल्यास तपासावर विपरित परिणाम होईल. अशा परिस्थितीत लद्दडने कारागृहातील रुग्णालयाच्या डॉक्टरशी संगनमत करून मेडिकलचे तिकिट मिळविल्याची माहिती आहे.

मंगळवारपासून मेडिकलमध्ये कुशल लद्दड हा मंगळवारी मेडिकलमध्ये दाखल झाला. तेव्हापासून आजपर्यंत त्याच्यावर किरकोळ उपचार करण्यात आले. त्याची प्रकृतीही ठणठणीत असल्याची माहिती मिळते. मेडिकलमध्ये त्याला भेटायला येणाऱ्यांची प्रचंड रेलचेल असून शेजारी रुग्णांना त्यांच्याकडून नेहमी कोटय़वधींच्या गोष्टींचा ध्वनीच ऐकू येतो. दिवसभर भेटायला येणाऱ्यांमुळे इतर रुग्णांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे.

लद्दडचे उपचार कारागृहात का नाही?

नक्षलवादी नेता प्रा. जी. एन. साईबाबाने आपण ९० टक्के अपंग असून उपचाराकरिता जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावेळी कारागृह प्रशासनाने कारागृहातील रुग्णालयात सर्व सुविधा असून सर्व प्रकारचे उपचार मिळत असल्याची ग्वाही दिली होती. मग, अचानक कोटय़वधींचा मालक लद्दड याच्या तापावर कारागृहात का उपचार होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अल्सरची तक्र

त्याने अल्सरची तक्रार केली, त्यामुळे त्याला तपासणीकरिता मेडिकलला पाठविण्यात आले असता तपासून त्याला दाखल करण्यात आले. मेडिकलच्या अहवालावरून त्याला नेमके काय झाले आहे आणि कोणते उपचार देण्यात आले, हे स्पष्ट होईल.

– योगेश देसाई,  अधीक्षक मध्यवर्ती कारागृह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 4:30 am

Web Title: dabba trading issue in nagpur
टॅग Nagpur
Next Stories
1 खडसेंच्या कार्यकाळातील निर्णयाची चौकशी करा; वक्फ मंडळाची मागणी
2 वृक्षारोपणात जगतात केवळ १० टक्के झाडे!
3 रेल्वे स्थानकावर सौरऊर्जा प्रकल्प
Just Now!
X