News Flash

जिल्ह्यात चार दिवस पावसाचे

गेल्या अनेक वर्षांत प्रथमच तासाभराच्या वादळी पावसाने शहरातील अनेक भागात असंख्य झाडे तुटून पडली.

(संग्रहित छायाचित्र)

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्य़ात बऱ्याच ठिकाणी ११ ते १४ जून या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एक किं वा दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच १४ जूनला एक-दोन ठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत वीज पडण्याचा धोका अधिक असल्याने पाऊस व वादळी वारा सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक शेताची कामे करावी. शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे-खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी. नागरिकांनी व नदीनाल्याजवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नदी किं वा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने के ले आहे. मंगळवारी शहरात पूर्वमोसमी पावसाने जोरदार प्रवेश के ला. दुपारी तासभर कोसळलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांना तलावसदृश स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळली.

गेल्या अनेक वर्षांत प्रथमच तासाभराच्या वादळी पावसाने शहरातील अनेक भागात असंख्य झाडे तुटून पडली. परिणामी वीजताराही तुटून पडल्या होत्या. तीन दिवसानंतरही असंख्य ठिकाणी ही झाडे तशीच पडली असून वीजताराही लोंबकळत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे शहरात सिमेंट रस्त्याची कामे सुरू असताना तुटून पडलेली झाडे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर तशीच पडून असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:07 am

Web Title: imd forecasts four days rain possibility in nagpur district zws 70
Next Stories
1 दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अ‍ॅड. निकम यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
2 मुद्रांक सवलतीची गौण खनिज स्वामित्वधनातून वसुली?
3 माजी प्रशासकीय अधिकारी  राम खांडेकर यांचे निधन
Just Now!
X