News Flash

उद्यापासून वाहनाचा शिकाऊ परवाना घरबसल्या मिळणार!

परिवहन विभागाकडून ‘एनआयसी’ला दुरुस्तीची सूचना

परिवहन विभागाकडून ‘एनआयसी’ला दुरुस्तीची सूचना

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : राज्याच्या परिवहन विभागाने  राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) ला  वाहनांशी संबंधित सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्तीची सूचना केली आहे. जेणेकरून १ एप्रिलपासून इच्छुकांना आवश्यक प्रक्रिया करून घरबसल्या वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना देता येईल. या उमेदवारांना परवान्यासाठी घरून ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.

राज्यात १६ प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि ३४ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. करोनामुळे या कार्यालयांत  कामावर मर्यादा आल्या आहेत. त्याचा  नागरिकांना फटका बसत आहे. त्यातच आरटीओ कार्यालयांत दलाल संस्कृतीही बोकाळल्याचा आरोप नेहमीच होत असतो. आरटीओ कार्यालयांची ही वाईट ओळख मिटवण्यासाठी परिवहन खात्याने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एनआयसीला सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेनुसार उमेदवाराला प्रथम वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी आरटीओच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून विशिष्ट तारीख घ्यावी लागेल. आधार कार्ड व इतरही माहिती अपलोड करून  शुल्क भरावे लागेल. त्यानंतर विशिष्ट तारखेला घरून ऑनलाईन परीक्षा देता येईल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांना घरबसल्या वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना मिळेल.

लघु चित्रफितीद्वारे जनजागृती

नवीन पद्धितीनुसार, सलग दोन दिवस प्रत्येकी ३० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार आहे. ही परीक्षा देताना अधूनमधून उमेदवारांच्या संकणक, लॅपटॉपवर रस्ते सुरक्षिततेबाबत नियमांची लघु चित्रफित व विविध नियम दृश्य स्वरूपात दिसतील. त्यातून जनजागृती करण्याचा परिवहन विभागाचा प्रयत्न आहे. सध्या आरटीओ कार्यालयात एकाच वेळी परीक्षा घेतली जाते.

१ एप्रिलपासून वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना इच्छुकांना घरबसल्या घेता यावा म्हणून परिवहन खात्याने एनआयसीला दुरुस्तीची सूचना केली आहे. ती वेळेत झाल्यास उमेदवार घरून ऑनलाईन परीक्षा देऊन परवाना मिळवू शकेल. ज्यांच्याकडे घरून परीक्षा देण्याची सुविधा नाही, त्यांना राज्यभरातील आरटीओ कार्यालयात पूर्वीप्रमाणे परीक्षा देता येईल.’’

– डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 12:57 am

Web Title: learning driving license at home from tomorrow by rto zws 70
Next Stories
1 विशेष रेल्वेगाड्यांमुळे प्रवासभाड्यात मिळणारी सवलत संपुष्टात
2 ‘बीपीसीएल’चे खासगीकरण होत असल्याने पंपचालक वाऱ्यावर
3 गडचिरोलीत पाच नक्षलवादी ठार
Just Now!
X