News Flash

गरजेपेक्षा निम्मीच शौचालये वापरण्यायोग्य

नागपूर हागणदारी मुक्त शहर म्हणून सरकारने घोषित केले असले तरी वास्तविकता वेगळी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राम भाकरे

हागणदारी मुक्तीचा दावा फोल

नागपूर हागणदारी मुक्त शहर म्हणून सरकारने घोषित केले असले तरी वास्तविकता वेगळी आहे. ११२ झोपडपट्टीबहुल भागात २६०० च्यावर शौचाालयाची गरज असताना केवळ १२०० शौचालये आहेत. त्यातील प्रत्यक्षात ४० टक्के शौचालय वापरण्याअयोग्य  आहे. त्यामुळे आजही झोपडपट्टीत राहणारे अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला शौचास बसल्याचे चित्र दिसून येते.

शहरात केलेल्या सर्वेक्षणानुसार ११२ झोपडपट्टीची नोंद आहे. त्यातील गेल्या चार वर्षांत १२०० घरी शौचालये बांधण्यात आली. तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल यांनी शहरातील विविध भागात दौरा केला. त्यावेळी त्यांना घरगुती शौचायलयाची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले होते. त्यांनी दुरुस्तीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते मात्र, त्याची अंमलबजावणी अजूनही करण्यात आली नाही. उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक ५ धम्मदीप नगरात आजही महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना शौचासाठी सार्वजानिक शौचायलयाचा आधार घ्यावा लागतो. ही सार्वजनिक शौचालये वापरण्यायोग्य नाही.

वाठोडा, हजारी पहाड, यशोधरानगर, चिखली, शिवणगाव आदी भागातील झोपडपट्टय़ांमध्ये बांधण्यात आलेल्या सार्वजानिक  शौचालयाचे दरवाजे तुटलेली आहेत, तर काही ठिकाणी शौचालय असून तेथे अस्वच्छता असल्यामुळे त्याचे कचराघर झाले आहे.

महापालिकेने शहरातील झोपडपट्टीधारकांना १२०० घरगुती शौचालय, ७१५ सार्वजानिक आणि ७२३ सुलभ शौचालये बांधून दिली आहेत. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर, हनुमाननगर झोनअंतर्गत झोपडपट्टी भागातील लोकांच्या घरात शौचालय बांधण्यात आले मात्र, त्याची अवस्था चांगली नाही. जाटतरोडी, तकिया या भागातील अनेक घरांमध्ये अजूनही शौचालय नाही. अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. नळ तुटलेले आहेत. सार्वजनिक शौचायलयाची अवस्था फारच वाईट आहे. लोक त्यात जात नाही आणि रस्त्याच्या कडेला जातात.

त्यामुळे केवळ हागणदारी मुक्त शहर असल्याचा महापालिका प्रशासनाकडून दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळी आहे. महापालिकेत नव्याने आयुक्त आल्यामुळे या दृष्टीने ते काय पावले उचलतात, याकडे लक्ष लागलेले आहे.

‘‘शहरात सार्वजानिक आणि घरोघरी १२४० शौचायले बांधण्यात आली. अजुनही काही भागात शौचायल बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील बाहेरील भागात (आऊटर) सार्वजानिक शौचालयाचे काम सुरू आहे.

डॉ. प्रदीप दासरवार , आरोग्य अधिकारी, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 12:56 am

Web Title: less than enough toilets are usable
Next Stories
1 शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी
2 नागपूरमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांची नवी शक्कल; कारमध्येच छोटा बेड
3 वनखात्याला स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकारी कधी मिळणार?
Just Now!
X