चंद्रपूरमध्ये दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसने तिघांना धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.
हैदराबादवरुन अहेरीला जाणारी एसटी बस सोमवारी सकाळी चंद्रपूर – अहेरी मार्गावरुन जात होते. यादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरीजवळ बससमोर एक दुचाकीस्वार आला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. बसने रस्त्यावरुन जाणा-या सहा ते सात जणांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघाताप्रकरणी एसटी बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केशवकुडे नंदवर्धन (६२ वर्ष), रितीक सुभाष कुंडोजवार (वय १६ वर्ष) आणि वत्सला ढोणू कंतकवार (वय ६५ वर्ष) अशी या मृतांची नावे आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2017 2:08 pm