News Flash

मुन्ना यादवला सरकारचे अभय

गुन्हेगारीचे राजकारण करणाऱ्यांना सरकार व पोलीस पाठीशी घालत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याने व राज्यमंत्री पदा

दोषारोपपत्रातून ३०७ कलम वगळले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यास गेल्या साडेचार महिन्यांपासून अटक करू न शकले ल्या नागपूर पोलिसांनी राजकीय दबावासमोर नांगी टाकत त्याच्याविरुद्धचे  खुनाचा प्रयत्नाचे कलम ३०७ दोषारोषपत्रातून वगळले आहे. गुन्हेगारीचे राजकारण करणाऱ्यांना सरकार व पोलीस पाठीशी घालत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याने व राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले मुन्ना यादव साडेचार महिन्यांपासून फरार आहेत. न्यायालयानेही त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. यावरून खुद्द मुख्यमंत्र्यांवर टीका झाली. मात्र, त्याला पाठीशी घालण्याचा निश्चय केलेल्या फडणवीस सरकारने मुन्ना यांच्यावरील गुन्ह्य़ाची धार कमी केली आहे. त्यासाठी वैद्यकीय अहवालाचा सबळ पुरावा गोळा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने भादंविच्या कलम ३२६ कलमांर्तगत मारहाण करून गंभीर दुखापत करणे या कलमाखाली सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून यादव यास मदत केली आहे.

२१ ऑक्टोबर २०१७ ला मुन्ना यादव आणि मंगल यादव या दोन गटात वाद झाला होता. भाऊबीज असताना मंजू यादव या मंगल यादव यांच्याकडे आलेल्या होत्या. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा तसेच मंगल यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धही पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्य़ाला खुनाच्या प्रयत्नाचा रंग दिला होता. या प्रकरणातील आरोपी व मुन्ना यादव याचा पुत्र करण व अर्जुन हे पोलिसांना शरण आले. त्यानंतर मुन्ना यादव यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. तेव्हापासून मुन्ना यादव व भाऊ बाला यादव हे फरार आहेत. दरम्यान, प्रकरणाचा तपास धंतोली पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे देण्यात आला. त्यामुळे आता मुन्ना यादव पोलिसांना शरण न येता खुनाच्या प्रयत्नाचे कलम ३०७ वगळून मारहाण करून गंभीर दुखापत करणे यासाठी असलेले भांदविच्या ३२६ अंतर्गत दोषारोषपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेवर दबाब टाकण्यात आला होता.

कलम वगळण्यासाठी शक्कल

मुन्ना यादव यांच्याविरुद्धचे खुनाचा प्रयत्नाचे कलम वगळण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी (गुन्हे शाखेने) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून पुन्हा अभिप्राय मागवला. या अहवालात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय अहवालातील जखमा अधिक गंभीर नसल्याचे नमूद करवून घेण्यात आल्याची माहिती आहे. या अहवालाच्या आधारावर मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध असलेले खुन्याच्या प्रयत्नाचे ३०७ कलम वगळण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2018 2:51 am

Web Title: munna yadav maharashtra government nagpur crime
Next Stories
1 लोकजागर : विद्यापीठ की अड्डा!
2 एकमेव महिला कॅब चालक निर्मला
3 सेंद्रिय शेतीच्या प्रचारक प्राची माहूरकर
Just Now!
X