News Flash

नागपुरात लग्न समारंभात डीजे वाजवण्यावरून वाद, एकाची हत्या; चौघे जखमी

नागपुरात लग्न समारंभात डीजे वाजवण्यावरुन झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली आहे

(सांकेतिक फोटो)

नागपुरात लग्न समारंभात डीजे वाजवण्यावरुन झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली आहे. तर चौघे जखमी झाले आहेत. कळमना हद्दीतील अमन लॉन जुना कामठी रोड येथे ही घटना घडली आहे. डीजेच्या गाण्यावरुन वाद झाल्याने आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत निखिल लोखंडे (२९) याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील डोंगरे मैत्रिणीच्या लग्नासाठी कळमना हद्दीतील अमन लॉन जुना कामठी रोड येथे गेले होते. यावेळी डीजेच्या गाण्यावरुन भांडण झाल्याने सात ते आठ जणांनी मिळून सुनील डोंगरे आणि त्याचा मित्र निखील लोखंडे यांना मारहाण केली. यावेळी धारदार शस्त्राने वार करुन सुनील डोंगरेला जखमी करण्यात आलं असून निखील लोखंडे याची हत्या करण्यात आली. सुनील डोंगरेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 12:57 pm

Web Title: murder after fight over dj song in marriage nagpur sgy 87
Next Stories
1 युवकाने तब्बल अडीच वर्षांनी तोंड उघडले!
2 प्रत्येक कुटुंबातील ‘विचार’ जाणण्यासाठीच ‘एनआरसी’चा घाट
3 २८ सहाय्यक वनसंरक्षकांना पदोन्नतीपासून डावलले
Just Now!
X