19 October 2019

News Flash

पत्नीला भेटायला निघाला, अन् तुरुंगात पोहोचला!

पत्नी माहेरी अमरावतीला गेली असून आजारी असल्याने तिला तो भेटण्यासाठी निघाला होता

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : पत्नीला भेटण्यासाठी अमरावतीला निघालेल्या एका ऑटोचालकाने नागपूर रेल्वे स्थानकावर मित्रासोबत एका प्रवाशांचा मोबाईल  चोरला आणि तुरुंगात गेला, पण त्याचा मित्र मोबाईल घेऊन फरार झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.

आरोपी शेख अनिस शेख युनूस (२३) हा ऑटोरीक्षा चालक असून मोठा ताजाबाद येथील रहिवासी आहे. पत्नी माहेरी अमरावतीला गेली असून आजारी असल्याने तिला तो भेटण्यासाठी निघाला होता. त्यासाठी तो रेल्वे स्थानकावर आला. येथे त्याची एका संशयीतासोबत मैत्री झाली. दोघेही फलाट क्रमांक आठवर गेले. यावेळी फिर्यादी कय्युम अनिला रेड्डी (१९, रा. करीमनगर, आध्रप्रदेश) हा गाडीच्या प्रतीक्षेत असताना त्याला झोप लागली. शेख युनूस आणि त्याच्या मित्राने कय्युमचा मोबाईल चोरला. चोरीचा मोबाईल शेख युनूसचा मित्र घेऊन फरार झाला. परंतु शेखला अमरावतीला जायचे असल्याने तो रेल्वे स्थानकावर थांबून होता.

काही वेळातच कय्युमला जाग आली. त्याला मोबाईल दिसला नाही. लगेच त्याने आरपीएफ ठाणे गाठले. सारा प्रकार सांगितला. लगेच सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात फुटेज तपासले असता शेख युनूस आणि त्याचा मित्र मोबाईल चोरताना दिसून आला. लोहमार्ग पोलीस (गुन्हे शाखा) पथकाने मोबाईल चोराचा शोध घेतला. काही वेळातच शेख युनूसला अटक केली. मात्र, त्याचा साथीदार मिळाला नाही. न्यायालयाने शेख युनूसला १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on May 15, 2019 3:47 am

Web Title: nagpur police arrest auto driver in mobile theft case