काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून शहरात पुन्हा हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे. मात्र, कारवाई करताना भेदभाव होताना दिसत आहे. अमरावती मार्गावरील पत्रकार सहनिवासनजीक तपासणी मोहिमेदरम्यान हेल्मट असूनही ते न घालणाऱ्या पोलिसांवर पथकाने कारवाई केली नाही. मात्र, हेल्मेट न घालता जाणाऱ्या महिलेशी याच मुद्दय़ावरून वाद घालण्यात आला.  राज्य परिवहन मंत्रालयाने  हेल्मेटसक्ती केल्यानंतर त्याला पहिल्यांदा विरोध झाला; परंतु सरकारने या मुद्दय़ावर ठाम राहत आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे परिवहन खात्याकडून शहरात जागोजागी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना अडविण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे कारवाईस ‘उत्सुक’ असलेल्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून पोलीस कर्मचारी मात्र सुटत आहेत.
Untitled-35