अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे; अपघात होण्याची शक्यता

नागपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डय़ांनी तोंड वर काढले आहे. काही महिन्यांपूर्वीच महापालिके ने बुजवलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाल्याने वाहतुकीस अडथळा ठरू लागले आहे.

शहरात डांबरी रस्त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले  आहे. त्यावर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी थातूरमातूर पद्धतीने बुजवले जाते. पाऊस पडला की ते पुन्हा तोंड वर काढतात. याही वेळी असेच झाले आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे वस्त्यांतर्गत व प्रमुख मार्ग खड्डेमय झाले आहेत. पाणी साचल्याने खड्डे दिसत नाही, पण वाहने उसळतात व पडतात. क्रीडा चौक ते मेडिकल चौक या भागातील डांबरी रस्ता गेल्या वर्षभरात चारवेळा दुरुस्त करण्यात आला. त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. सिव्हिल लाईन परिसरातही हीच स्थिती आहे. वर्धा मार्गावर हॉटेल रॅडिसन ब्ल्यू चौकात, अजनी चौकात मोठे खड्डे आहेत. ते दिसले नाही व त्यावरून दुचाकी गेली तर वाहनाला अपघात होतो. मेट्रोने तयार केलेले रस्तेही उखडले आहेत. सोनेगाव  पोलीस ठाण्यालगतचा रस्ता त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. नंदनवन परिसरातील रस्त्याची कामे निधीमुळे अडली असल्याचे नगरसेवक सांगतात. पण खड्डय़ांबाबत ते  काहीच बोलत नाहीत.

अनेक भागात सिमेंट व डांबरी रस्त्याची आणि ओसीडब्ल्यू व केबल टाकण्याचे काम सुरू आहेत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमी वर मधल्या काळात काम बंद असल्यामुळे काही भागात तर ऐन पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.

शहरातील खड्डय़ांकडे महापालिके चे लक्ष वेधले होते. दरवर्षी खड्डे पडतात व ते बुजवण्यावर लाखो रुपये खर्च के ले जाते, नंतर पुन्हा ते खड्डे तोंड वर काढतात. कं त्राटदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात. त्याचा भरुदड नागरिकांवर बसतो. पण अधिकारी किं वा कं त्राटदारावर कोणतीही कारवाई के ली जात नाही.

– अभिजित सिंग चंदेल, सिटीझन फोरम