04 December 2020

News Flash

दारूऐवजी सॅनिटायझर पिल्याने सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

गौतम बिसेन गोस्वामी (४५) रा. गुजरनगर, गंगाबाई घाट असे मृताचे नाव आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : दररोज मद्य प्राशन करण्याची सवय असलेल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने एक दिवस दारू न मिळाल्याने घरातील सॅनिटायझर प्राशन केले. यामुळे प्रकृती खराब होऊन त्याचा  मृत्यू झाला. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत गंगाबाई घाट परिसरात सोमवारी उघडकीस आली.

गौतम बिसेन गोस्वामी (४५) रा. गुजरनगर, गंगाबाई घाट असे मृताचे नाव आहे. गौतम हे महापालिकेत रोजंदारीवर सफाई कामगार  होते. ते पत्नी व मुलासह राहात होते. त्यांना दारूचे व्यसन होते. पण, टाळेबंदीमध्ये त्यांना दारू मिळत नव्हती.

या काळात त्यांनी सॅनिटायझर प्राशन केले. नियमित सॅनिटायझर पिल्याने २१ जून रोजी त्यांची प्रकृती बिघडली.  त्यांच्या मुलाने त्यांना  मेयोत दाखल केले. आठ त्यांच्यावर उपचार झाले. पण, रविवारी सायंकाळी  त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:59 am

Web Title: sweeper dies after drinking sanitizer instead of liquor zws 70
Next Stories
1 अपघातात दगावलेल्या बाधिताची नोंद करोनात की इतर संवर्गात?
2 गणेश मंडळांकडून अद्याप मूर्तीची पूर्वनोंदणी नाही
3 महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिनचर्येत टाळेबंदी, विलगीकरणाचीच चर्चा!
Just Now!
X