अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, ईशान अग्रवाल यांचे पालींवरील संशोधन ‘झुटाक्सा’ पत्रिकेत

नागपूर : महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी त्यांच्या संशोधनाचा झेंडा देशाबाहेर रोवला असून करोनाकाळातही त्यांच्या संशोधनात सातत्याने भर पडत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातून तर मागील वर्षी मे महिन्यात तामिळनाडू आणि कर्नाटकातून नव्या पालींचा शोध त्यांनी लावला. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हरिश्चंद्र गडावर सापडलेली पाल इतर पालींपेक्षा अतिशय वेगळी आहे. अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अग्रवाल या तरुण संशोधकांचा हा अभ्यास ‘झुटाक्सा’ या संशोधन पत्रिके त नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

भारतात आढळणाऱ्या पाली या निशाचर असतात, पण ‘निमास्पिस’ कु ळातील पाली या दिवसा संचार करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडावर आढळलेली पाल ही बेसॉल्टिक दगडांवर आढळून येते. संशोधकांना ती मागील वर्षीच आढळली होती, पण यावर्षी जानेवारीमध्ये त्यांनी या पालीचा अभ्यास के ला. इतर पालींपेक्षा अतिशय वेगळी असल्याने त्यांना डीएनए चाचणी करण्याची गरज पडली नाही, तर के वळ आकारशास्त्रावरून तिचा शोध घेतला. या पालीचे नामकरण त्यांनी ‘निमास्पिस उत्तरघाटी’ असे के ले. तामिळनाडूतील कृ ष्णगिरी गडावर शोधलेली पाल प्रामुख्याने ग्रेनाईट दगडांवरच आढळते. या पालीचे नामकरण त्यांनी ‘निमास्पिस कृष्णगिरीएन्सिस’असे के ले. महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील या दोन्ही प्रजाती गडांवरच आढळतात. कर्नाटकातून शोधलेली पाल मात्र झाडीझुडपे असणाऱ्या प्रदेशात आणि झाडांवरच आढळते. या पालीचे नामकरण त्यांनी ‘निमास्पिस शालराय’ असे के ले आहे. संशोधक डॉ. जॉर्ज शालर यांच्या नावावरून त्यांनी हे नामकरण के ले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विशेषत: चंद्रपूर येथेही त्यांनी संशोधन के ले आहे. या तीनही पालींचे वैशिट्य म्हणजे त्या दिवसा संचार करणाऱ्या असून मध्यम आकाराच्या (३५ मिलिमीटर ते ४० मिलिमीटर) आहेत. ‘निमास्पिस’ कु ळातील या पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि इतर पालींपेक्षा प्राचीन आहेत. भारतात आजवर या कु ळातील सुमोर ५० प्रजातीची नोंद झाली आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स इन्स्टिट्यूट’ आणि ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या मदतीने या तरुण संशोधकांनी पालीच्या या नव्या प्रजातींचा शोध घेतला आहे.

तामिळनाडू आणि कर्नाटकातील पालींचा शोध घेतला तेव्हा आम्ही तिघेही कार्यक्षेत्रावर होतो. तर महाराष्ट्रातील पालही मागील वर्षीच पाहिली होती. मात्र,  या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही काम पूर्ण के ले. महाराष्ट्रात आढळलेल्या पालीचा आकारशास्त्रावरूनच अभ्यास करता आला, पण उर्वरित दोन पालींसाठी आकारशास्त्र आणि डीएनए चाचणी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करावा लागला. त्यानंत पाच महिन्यांनी हा अभ्यास ‘झुटाक्सा’ या संशोधनपत्रिके त प्रसिद्ध झाला.