वर्धा : वैद्यकीय क्षेत्रात विक्रम करण्यासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळायची सोय नसते. रुग्ण हाताळताना डॉक्टरांच्या डोक्यावर सदैव टांगती तलवार असल्याचे म्हटल्या जाते. कारण नातेवाईकच नव्हे तर सरकार व समाजास जाब द्यावा लागतो. हे सर्व ध्यानात ठेवून सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत नवा उच्चांक गाठला. राज्य शासनाने अशा शस्त्रक्रियेस मान्यता दिली. त्यामुळे हे राज्यातील पहिले व एकमेव असे खाजगी रुग्णालय ठरले.

रुग्णालयाने गरजू रुग्णांना दिलासा देण्याचे धोरण ठेवले. निवडक शंभर रुग्णांची निवड सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी करण्यात असली. अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात चार चमू गठित करण्यात आल्या. अठरा ते अंशी वयोगटातील या शंभर रुग्णांवर शंभर दिवसांत यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

हेही वाचा – “ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीपर्यंत…”, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा संकल्प; म्हणाले, “पुरोगामी राज्य म्हणून…”

एकही रुग्ण जंतूसंसर्ग बाधित झाला नसून, सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. संदीप यांनी सांगितले. तसेच आरोग्य योजनेत ही शस्त्रक्रिया पार पडल्याने एकाही रुग्णला एक रुपयासुद्धा खर्च आला नसल्याचे रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ. उदय मेघे म्हणाले. हा विशेष गौरव प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे कुलपती दत्ता मेघे यांनी सर्व चमूचा खास सन्मान केला.

हेही वाचा – हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समितीत राष्ट्रवादीचं वर्चस्व; सुधीर कोठारी यांचे नेतृत्व पुन्हा प्रस्थापित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याच्या आरोग्य विभागाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तज्ञ चमूत डॉ. रत्नाकर अंबादे, डॉ. गजानन पिसुळकर, डॉ. किरण सावजी, डॉ. नरेश धानिवला, डॉ. संजय देशपांडे, डॉ. समल, डॉ. आदित्य पुंडकर व अन्य सहभागी होते.