बुलढाणा: राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरील नायगाव फाट्यावर असलेल्या अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यांमध्ये दोन युवकांचा गुदमरून मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ सप्टेंबरच्या रात्री घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

यानंतर प्रसिद्धी माध्यमानी थेट पालकमंत्री मकरंद पाटील याच्या पर्यंत सर्वांचे लक्ष वेधले. पालकमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्यावर यंत्रणा खडबडून जागी झाल्या. यानंतर कारवायाचा धडाका सुरु झाला.वरिष्ठांच्या आदेशाने प्रशासनाने तातडीने अवैध बायोडिझेल पंपा वर कारवाई करण्यास सुरुवात केली. नांदुरा व मलकापूर तहसील कार्यालयानी  संयुक्त कारवाई केली. ११ अवैध पम्प सील करण्यात आले. यामध्ये नांदुरा मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील गट क्रं ५२५ मेवात अलवर ढाबा,५३१ लाजवाब ढाबा, ६४८ भोलेनाथ यूपी ढाबा, ६४९ जम्मू हिमाचल ढाबा, २६ जम्मू हिमाचल ढाबा, २०१ सहयोग हॉटेल, ६४८ फिरोज भाई का ढाबा, १२०  तर नांदुरा खामगाव रोड वरील गट नं ७३,७४,४५ वर सय्यद नाझिम सय्यद रहीम,तफजुलखा तस्लीमखा, महादेव परशराम जुमडे, रजनी सोपान खाचणे, अझहरखान जफरउल्ला खान, सुनहरा जकरीया महेमूद, जनार्दन परशराम जुमडे, फरजानाबानो  मो. मुनीर कच्छी, युसुफ खान सुभेदार खान, म. सलीम उस्मान कुरेशी यांच्या मालकीच्या जागेत हे अवैधरित्या बायोडिझेल पंप चालू होते सदरची कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आहे

सव्वातीन हजार लिटर बायोडीजल जप्त

अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायीकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोनि. सुनिल अंबुलकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक करुन, जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे लगत अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायिक विरुद्ध कारवाई केली. मलकापुर शहर व एम आय डी सी  पोलीस ठाणे दसरखेड हद्दीत स्थागुशाचे पथकाने कारवाई केली.धरणगाव शिवारातील हॉटेल फौजी धाब्याचे बाजुला अवैध बायोडिझेलचा साठा जमीनीमध्ये पुरलेल्या लोखंडी टाक्यामध्ये असुन विक्री करीत आहे. अशा गोपनिय माहीतीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे पथकाने कारवाई केली.  पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय मलकापुर यांचे सह सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी सय्यद अब्दुला सय्यद याकुब, रा. पारपेठ, ता. मलकापुर, यास ताब्यात घेवून १ हजार २०० लिटर बायो डिझेल व इतर साहित्य असा एकूण २ लाख ६४ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सय्यद अब्दुला सय्यद याकुव, शेख इम्रान शेख इस्माईल यांचे विरुध्द  मलकापुर शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला .

 रनथम शिवारातील हॉटेल एकता समोर अवैध बायोडिझेलचा साठा जमीनीमध्ये पुरलेल्या लोखंडी टाक्यामध्ये केलेला असुन विक्री करीत आहे, अशा गोपनिय माहीती मिळाली.  आधारे स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे पथकाने, पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय मलकापुर यांचे सह सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी नामे इम्रान खान फिरोज खान, वय २० वर्षे रा. बेरजाली मैदपुर जि.उज्जैन, मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन सदर ठिकाणावरुन २००० लिटर बायो डिझेल व इतर साहित्य असा  ३ लाख २२हजार रूपयांचा चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी इम्रान खान फिरोज खान, लखन पांचाळ, शाकीर खान मास्टर  मध्यप्रदेश,  मो. नईम शेख रा. मेहरुन जळगांव, अरर्शद तेली रा. गुजरात, यांचे विरुध्द पोलीस ठाणे दसरखेड, एम आय डी सी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई  पोनि. सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्यात पोउपनि, अविनाश जायभाये, पोउपनि पकंज सपकाळे, दिपक लेकुरवाळे, शेख चांद,  गणेश पाटील, पोको. गजानन गोरले, चालक निवृत्ती पुंड, यांनी  केली.