नागपूर: मॉल्समधील झगमगाट बघितल्यावर तेथे विविध विक्री दालनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयींबाबत कोणाच्या मनात शंका येणार नाही, मात्र ग्राहक सेवेत तत्पर्ता दर्शवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. १२ तास कामाची वेळ आणि जेवणाची वेळ सोडल्यास सलग उभे राहूनच ग्राहक सेवा देण्याची अट कर्मचाऱ्यांसाठी अडचणीची असल्याचे असंगठित कामगार कांग्रेसच्या शिष्टमंडळाने मॉल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

नागपूरसारख्या मोठ्या शहरात गत काही वर्षांपासून मॉल संस्कृती रुजली आहे. अनेक मॉल्समध्ये देश-विदेशातील मोठ्या कंपन्यांचे विक्री दालने सुरू झाली असून तेथे मोठ्या संख्येने तरुण-तरुणी काम करतात. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत असंघटित कामगार काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने शहरातील मेडिकल चौक परिसरातील एका मॉल्समध्ये भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत व्यवस्थापनाचे लक्ष वेधले.

हेही वाचा – वर्धा : नगर परिषदेच्या वाढीव कर आकारणीस स्थगिती

हेही वाचा – इन्स्टाग्रामवर मैत्री, भेटीगाठी, लग्नाच्या आणाभाका, बदनामी अन् आता पोलिसांची बेडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचारी १२ तासांच्या शिफ्टमध्ये सेवा देतात आणी त्याना एक मिनीटसुद्धा बसायला परवानगी नसते. अखिल भारतीय असंगठित कामगार व कर्मचारी कांग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबालकर यांच्यासह इंटकचे अध्यक्ष विनोद पटोले, उपाध्यक्ष अशोकसिंग चौहान, ॲड. गिरीश दादिलवार, चंद्रकांत वासनिक यानी व्यवस्थापनाचे याबाबींकडे लक्ष वेधले व यात सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.