नागपूर: अमरावती महामार्गावरील कोंढाळी नजिकच्या जामगढ़ येथील शेतकरी रणनवरे यांच्या संत्रा बागेतील १३०० झाडे आगीत जळून राख झाली. यासोबतच बागेत लावलेली ठिबंक सिचनाचे साहित्य व स्प्रीक्लरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
जामगढ़ येथील प्रगतिशील शेतकरी विजयसिंह रणनवरे, मदनराव रणनवरे, प्रशांत रणनवरे,तथा रणजीत रणनवरे यांची संत्रा बाग आहे. तेथे ओलीताची व्यवस्था असल्याने ही बाग उत्तमरित्या बहरली होती. बागेत संत्र्याची १३०० झाडे होती.
२४एप्रिलच्या सकाळी बागेत आग लागली. उन्हामुळे तिने रौद्ररूप धारण केले आणि पाहता पाहता बागेतील सर्व १३०० संत्र्याची झाडे जळून नष्ट झाली. बागेत ओलीतासाठी लावलेली अत्याधुनिकही जळाली.
बांधावर लावलेले उच्च प्रतिचे सहा हजार बांबूचाही आगीत कोळसा झाला. यामुळे रणनवरे बंधूंचे २० लाखांहून अधिकचे नुकसान झाले. या घटनेची तक्रार विजय सिंह रणनवरे यांनी २५एप्रीलला कोंढाळी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.