नागपूर: मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यांसह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने या नदीवरील गोसीखूर्द धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होत आहे. गोसीखूर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे १५ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत.

शुक्रवारी ते अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. या धरणांमधून सध्या ६२ हजार ९३५ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर सर्वच्या सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामधून जवळपास दीड लाखांहून अधिक क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पाऊस थांबल्याने ३३ पैकी ३१ दरवाजे बंद करण्यात आले होते.

हेही वाचा… अकोला: खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात विनापरवाना कॅफे; कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फक्त दोनच दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता. पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने गोसीखुर्द धरणाचे दरवाजे प्रशासनाने उघडले आहेत. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने आणि धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढल्याने गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.