लोकसत्ता टीम

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलात ‘आर.डी.एस.एस.’ योजनेतील वाहिनी विलगीकरण तसेच यंत्रणा सक्षमीकरणची, विस्तारीकरणाची आणि पायाभूत विकासाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये १७८ कृषी वाहिन्यांचे विलगीकरण होईल. महावितरणने निश्चित केलेल्या गुणवत्तेनुसारच कामे करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले.

Central government opposes increase in power generation in Deonar Mumbai print news
देवनारमध्ये वीजनिर्मिती वाढीस केंद्राचा विरोध; प्रकल्प मंजुरीनंतर वीजनिर्मिती क्षमता वाढवणे नियमबाह्य असल्याचा अभिप्राय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
buldhana Makar Sankranti nylon manja disrupted electricity in Nandura city
बुलढाणा : नायलॉन मांजामुळे वीज पुरवठा खंडित; विद्युत तारा तुटल्या, १५ ते २० मीटर जळाले…
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
underground Ulhasnagars old electricity system is fulfilled with 16 84 crore funding approved
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर

महावितरणच्या पायाभूत आराखडा विभाग आणि परिमंडलात ‘आर.डी.एस.एस.’ योजनेचे कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा अनिल वाकोडे, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून सागर आष्टनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी वाचा-महाराष्ट्र- मध्यप्रदेश दरम्यान ८ ऑक्टोबरपासून आणखी रेल्वेगाडी

पुढील दहा वर्षाचा विचार करून परिमंडळात वीज यंत्रणेच्या विस्तारीकरणाची आणि सक्षमीकरणाची अनेक कामे प्रस्तावित केलेली आहे. ‘आर.डी.एस.एस.’ योजना ही याचाच भाग असून या योजनेत परिमंडळात २६२ कोटी खर्च करून १७८ कृषी वाहिन्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वीज यंत्रणेची कामे करतांना वापरत असलेले साहित्य आणि कामाची पद्धत महावितरणने निश्चित केलेल्या दर्जानुसारच करण्यासाठी कर्मचाऱ्यांना धडे देण्यात आले.वीज खांबासाठी करण्यात येत असलेला गड्ड्यापासून तर साहित्याचा दर्जा तपासण्याची जबाबदारी नियंत्रण अधिकारी यांची आहे.

कामाची गुणवत्तेची पडताळणी करूनच काम पूर्ण करण्याबाबत अहवाल देण्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिमंडलात भविष्याच्या दृष्टिकोणातून अनेक भरीव कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे ती कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांच्या पुढाकाराने पायाभूत आराखडा विभागाचे अभियंते आणि कंत्राटदाराकडे काम करणारे अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त कार्यशाळा घेऊन प्रत्येकांचे काम आणि जबाबदारी यावर कार्यशाळेत सादरीकरणाद्वारे तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले.

Story img Loader