सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १९१ उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता त्यांना पुढील निवडणुका लढण्यास पात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी अलीकडेच त्यांना पात्र ठरवले आहे. यामुळे नजीकच्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक लढण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये लोणार तालुक्यातील ६१, चिखलीमधील ५३, सिंदखेडराजामधील ५१ तर मलकापूर तालुक्यातील २६ उमेदवारांचा (ग्रामीण कार्यकर्त्यांचा) समावेश आहे.

२०२० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील १४ ख (१) नुसार निवडणुकीत उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांनी निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक होते. नोटीस बजावूनही हिशेब सादर न करणाऱ्या ११२२ उमेदवारांना पुढील निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्यात आले.

हेही वाचा : मुलीच्या पाळण्याच्या दोरीनेच पत्नीचा गळा आवळला ; खर्चासाठी पैसे मागताच नराधम पतीचे कृत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ रोजी त्यांना अपात्र ठरवले. याविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने २७ ऑगस्ट २०२१ च्या आदेशात माघार घेणाऱ्या उमेदवारांना हिशेब सादर करणे आवश्यक नसल्याचे नमूद आहे. ही बाब व खंडपीठाने आदेशात नोंदवलेल्या निरीक्षणानुसार माघार घेणाऱ्या १९१ जणांविरुद्धचा अपात्रतेचा आदेश जिल्हाधिकारी यांनी नुकताच रद्द केला आहे.