scorecardresearch

चंद्रपुरात २० दशलक्ष टन क्षमतेची पेट्रोल रिफायनरी ; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांची घोषणा

तत्कालीन आघाडी सरकारच्या भूसंपादनाच्या जाचक अटीमुळे रत्नागिरी येथील ६० दशलक्ष टन क्षमतेची रिफायनरी सुरू करण्याचा प्रकल्प बारगळला.

चंद्रपुरात २० दशलक्ष टन क्षमतेची पेट्रोल रिफायनरी ; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांची घोषणा
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित 'मोदी@20' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

तत्कालीन आघाडी सरकारच्या भूसंपादनाच्या जाचक अटीमुळे रत्नागिरी येथील ६० दशलक्ष टन क्षमतेची रिफायनरी सुरू करण्याचा प्रकल्प बारगळला.मात्र, आता देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात २० दशलक्ष टन वार्षिक क्षमतेची पेट्रोल रिफायनरी सुरू करण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केली.

हेही वाचा >>> बुलढाणा : भगर विषबाधितांची संख्या २६ वर ; चिखली, जाफ्राबाद तालुक्यातील ग्रामस्थांचा समावेश

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित ‘मोदी@20’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. मोदी सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देतानाच पुरी यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधक लोकांचे प्रस्न मांडत नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>> सभागृहात कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

आघाडीचे सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाली. मात्र, आता शिंदे सरकारने पुन्हा एकदा विकासाची गती पकडली आहे. रत्नागिरीत रिफायनरी प्रकल्प झाला नसला तरी पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न करू असे सांगतानाच चंद्रपूरमध्ये २० दशलक्ष टन वार्षिक क्षमतेची रिफायनरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.तत्पूर्वी येथील हॉटेल एनडीमध्ये पुरी यांनी उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर, अभियंता, सीए यांच्यासोबत बैठक घेतली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ न्यूज ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 20 million tonne capacity petrol refinery at chandrapur announced by union petroleum minister hardeep singh puri amy

ताज्या बातम्या