महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून २०२०-२०२१ ते २०२२-२३ दरम्यान तीन वर्षांमध्ये २० लाख ८७ हजार ७२३ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

राज्यात प्रत्येक वर्षी योजनेतून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नुकतेच राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला एकत्र करण्यात आले आहे. मध्यमवर्गीय व गरिबांवरील उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना २०१२-१३ मध्ये सुरू झाली. त्यावर्षी योजनेतून ४८ हजार ८३० रुग्णांवर उपचार झाले. २०१६-१७ मध्ये ४ लाख ३२ हजार ८२९ रुग्णांवर, २०२०-२१ मध्ये ५ लाख ३१ हजार ६७० रुग्णांवर, २०२१-२२ मध्ये ७ लाख ४७ हजार ५९१ रुग्णांवर तर २०२२-२३ मध्ये ८ लाख ८ हजार ४६२ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

लाभार्थींची संख्या वाढत असल्याने विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्येही वाढ होत आहे. सध्या या योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढल्यास लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-ओबीसी महासंघाचा न्या.शिंदे समितीवरच आक्षेप; बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही सर्वसामान्य नागरिकांवरील उपचारासाठी लाभदायी योजना आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील २० लाखाहून जास्त रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. -रवी शेट्ये, सहाय्यक संचालक, महात्मा फुले जनआरोग्य योजना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची स्थिती

वर्ष दाव्यांची संख्या दाव्याची देय रक्कम
२०२०- २१५,३१,६७० १०९२,७५,१०,९३८
२०२१- २२७,४७,५९११६६१,६४,३५,१०५
२०२२- २३८,०८,४६२ १८३६,८९,९३,७६०
एकूण २०,८७,७२३४५९१,२९,३९,८०३