लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ताडोबातील वाघ व इतर वन्यजीवाबद्दल माहिती व्हावी तसेच त्यांना निसर्ग शिक्षण मिळावे यासाठी ताडोबा प्रशासनाच्या वतीने ‘चला माझ्या ताडोबाला’ हा महत्वपूर्ण व नावीन्यपूर्ण उपक्रमाला सुरूवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ४० हजार विद्यार्थ्यांना मोफत ताडोबाची सफारी घडवून आणण्यात आली आहे. आता बफर क्षेत्रामधील १२१ शाळेतील ५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माेफत ताडोबाची सफारी घडवून आणण्यात येणार असून या सफारीचा शुभारंभ ताडोबाच्या मुख्य कार्यालयातून हिंरवी झेंडी दाखवून करण्यात आला आहे.

bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Dadar-Ratnagiri Railway , Konkan , train to UP,
दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
Gyanranjan Education Project Workshop, Webinar ,
संस्थाचालकांनो, ६ जानेवारी लक्षात ठेवा आणि सहभागी व्हा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये ८० प्रजातीचे सस्तन प्राणी, २८० पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, प्रजातीचे सरपटणारे प्राणी, १२५ प्रजातीचे फुलपाखरे, ६७० पेक्षा अधिक वनस्पतीचा प्रजातीने या वनाची समृ‌द्धता वाढवली आहे. तर ७९ टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरिता हा उत्तम असा अधिवास आहे. सन २०२१-२२ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये ८७ वाघाची नोंद झाली आहे. या ताडोबाची माहिती ताडोबाच्या बफर क्षेत्रातील विद्‌याथ्यांना व्हावी यासाठी “चला माझ्या ताडोबाला” हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम सन २०१५-१६ पासून शालेय वि‌द्यार्थ्यांमध्ये जन-जागृती व्हावी यासाठी सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत आजपावतोर ४० हजार पेक्षा अधिक बफर क्षेत्रातील तसेच प्रादेशिक वन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या ताडोबा वनभ्रमंतीमध्ये सहभाग घेतला आहे. सन २०२२- २३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२५ शाळेतील ५००० विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहापूर्वक सहभागी झाले होते. आणि यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील २७ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष.

आणखी वाचा-लोकसत्ता लोकांकिका : तरुणाईच्या जल्लोषात स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

गतवर्षी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनूसार मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी या गावातील शाळेपासून झाली आहे. नव्यानेच पुनवर्सित झालेले भगवानपूर गावातील या उप्रकमाची सुरूवात करण्यात येत आहे. चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण १२१ शाळेतील ५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनश्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.

Story img Loader