scorecardresearch

Premium

चंद्रपूर : ४७३ गावांना ५९ हजार ४५९ हेक्टर वनहक्क दावे प्राप्त

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामसभा वनहक्क दाव्याबाबत अग्रेसर आहे. जिल्ह्यातील १ हजार ९४ गावांना १ लाख ४२ हजार ९०० हेक्टर जमिनीचे वनहक्क दावे मिळणे अपेक्षित असून आतापर्यंत ४७३ गावांना ५९ हजार ४५९ हेक्टर जमिनीचे वनहक्क दावे प्राप्त झाले आहे.

villages of Chandrapur district
चंद्रपूर : ४७३ गावांना ५९ हजार ४५९ हेक्टर वनहक्क दावे प्राप्त (image – pixabay/representational image)

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामसभा वनहक्क दाव्याबाबत अग्रेसर आहे. जिल्ह्यातील १ हजार ९४ गावांना १ लाख ४२ हजार ९०० हेक्टर जमिनीचे वनहक्क दावे मिळणे अपेक्षित असून आतापर्यंत ४७३ गावांना ५९ हजार ४५९ हेक्टर जमिनीचे वनहक्क दावे प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, शेकडो गावांनी वनहक्कांसाठी दावेच केले नसल्यामुळे त्यांना अद्यापही वनहक्क दावे मिळालेले नाही.

राज्यात चंद्रपूर जिल्हा हा वनहक्क दावे प्राप्त करून घेण्यात आघाडीवर आहे. राज्यात एकूण ८ हजार ५३६ मान्यताप्राप्त वनहक्क दावे असून ४८४ दावे हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. मात्र, ग्रामसभांना मिळालेल्या वनहक्क दाव्यामध्ये तफावत आहे. विशेष म्हणजे, संभाव्य क्षेत्र अधिकचे असून प्रत्यक्षात ग्रामसभांना मिळालेले वनहक्काचे दावे हे तोकडे व कमी आहे. त्यामुळे आदिवासी बांधव वनसंपत्तीच्या आर्थिक लाभापासून वंचित आहेत.

water shortage Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता; नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट
Factory owners of Kolhapur and Sangli district will pay Rs 100 from last season says Hasan Mushrif
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मागील हंगामातील १०० रुपये देणार – हसन मुश्रीफ
Overdue loans under Mudra scheme at 4 thousand 234 crores
‘मुद्रा’ योजनेतील थकीत कर्जे चार हजार २३४ कोटींवर; परभणी जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण
girlfriend boyfriend dead Pardi
वर्धा : १५ दिवसांपासून बेपत्ता प्रेमीयुगुल मृतावस्थेत आढळले, दोघांनी पायाला ओढणी बांधून…

हेही वाचा – चंद्रपूर: जिल्हा बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, ‘सुसाईड नोट’मध्ये अनेकांची नावे

जिल्ह्यातील ग्रामसभांना वनहक्क दाव्याबाबात कोणतीही माहिती नसल्यामुळे त्यांना दावा करण्यात अडचणी निर्माण होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने दावा प्रक्रिया सुरू करण्यासाठी जनजागृती करून ग्रामसभांच्या बैठका घेवून आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा. त्यानंतर वनहक्क दावा केल्यानंतर दाव्यांची सुनावणी, पुनरावलोकन, स्पष्टीकरणे, क्षेत्राचे सीमांकन, अधिकाराचे रेकॉर्ड, नकाशे तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा – नागपूर : पती एचआयव्हीग्रस्त असूनही थाटला संसार, समलैंगिक असल्याचे समजताच…

१०० गावांत काम सुरू

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, फाऊंडेशन फॉर इकोलॉजिकल सिक्युरिटी आणंद गुजरात व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने सेंटर फॉर क्लामेंट चेंज ॲन्ड सस्टेनेबिलिटी स्टडीज चंद्रपूर जिल्ह्यातील ८ तालुक्यांत १०० वनहक्क दावा प्राप्त गावामधील लोकांच्या उत्पन्नात वाढ होवून जीवनमान उंचाविण्यासाठी कृतीशील उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामसभांना मार्गदर्शन करून त्यांना वनाधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. हा प्रकल्प २०२५ पर्यंत चालणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 473 villages of chandrapur district received forest rights claims of 59 thousand 459 hectares rsj 74 ssb

First published on: 09-12-2023 at 10:38 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×