अकोला : मनोरुग्णालयात तपासणीसाठी नोंदणी केल्याप्रकरणात आमदार अमोल मिटकरींनी ५० लाखांचा मानहानीचा दावा दाखल करण्याची नोटीस बजावली. या दाव्याची रक्कम जमा करण्यासाठी राज्यभर ‘भीक मांगो’ आंदोलन करणार असल्याची माहिती शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाचे अंकुश गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या व्याख्यानातून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मांडणारे अमाेल मिटकरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. १६ वर्ष महापुरुषांचे विचार व्यक्त करणारे अमोल मिटकरी १६ मिनिटात आपले विचार कसे बदलतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची प्रकृती बिघडली का?, त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला का? असे प्रश्न मनात निर्माण झाल्याने डॉ. तिरुख यांच्या रुग्णालयामध्ये त्यांच्या तपासणीसाठी नोंदणी केली होती. त्यावर संताप व्यक्त करीत आमदार अमोल मिटकरींनी ५० लाख रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याची नोटीस चार दिवसांपूर्वी बजावली आहे, असे अंकुश गावंडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपूर: ‘अजनी रेल्वेस्थानकाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या’.. स्वाक्षरी मोहीमेबाबत पहा..

कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे एक-एक रुपया जमा करून आमदार मिटकरींचे व्याख्यान आयोजित करत त्यांना मोठे केले, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मानहानीच्या दाव्याची रक्कम गोळा करण्यासाठी एक-एक रुपया जमा करण्यात येईल. त्यासाठी राज्यभर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे, असे अंकुश गावंडे म्हणाले.

हेही वाचा >>>नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात आठ फुटांचा साप.. वारंवार साप का निघतात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार अमाेल मिटकरींवर उपचार व्हावेत, या प्रामाणिक हेतूने त्यांच्या तपासणीसाठी रुग्णालयात नोंदणी केली होती. त्यावर त्यांनी संताप व्यक्त करून ५० लाखाच्या मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. आमदार मिटकरींना मोठे करण्यात मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेडसह अनेक पुरोगामी विचारांच्या संस्थांचा मोठा हात आहे. त्यांनी देखील ‘भीक मांगो’ आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन गावंडे यांनी केले.