अमरावती : एका ३२ वर्षीय विवाहित महिलेच्‍या घरात शिरून आरोपीने तिला काठीने मारहाण केली आणि नंतर ठार मारण्‍याची धमकी देऊन तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याची खळबळजनक घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील एका गावात उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात गुन्‍हे दाखल केले आहेत.

जगदीश उकंडराव मेश्राम (३५) असे आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. आरोपी हा मद्यपान करून पीडित महिलेच्‍या घरात शिरला, त्‍यावेळी तिचा पती बाहेर गेला होता. आरोपीने पीडित महिलेच्‍या मुलाला धमक्‍या देऊन घराबाहेर पाठवले. महिलेने आरोपीला दारू पिऊन घरात का शिरला, असा जाब विचारल्‍यावर आरोपीने पीडित महिलेच्‍या हातावर, पायावर काठीने मारहाण केली. तू जर आरडाओरड केली, तर तुला मारून टाकेन, अशी धमकी आरोपीने या महिलेला दिली. नंतर आरोपीने पीडितेवर बलात्‍कार केला. आरोपीचा प्रतिकार करण्‍याचा प्रयत्‍न या महिलेने केला, पण तो व्‍यर्थ ठरला.

हेही वाचा – वर्धा : उपमुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित महिलेने नंतर तळेगाव पोलीस ठाण्‍यात पोहोचून आरोपीच्‍या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपीच्‍या विरोधात बलात्‍काराच्‍या कलमासह विविध कलमान्‍वये गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत.