नागपूर : एका रियल इस्टेट कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगून कामठीतील एका तरुणाने एक नव्हे तर तब्बल १२ उच्चशिक्षित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सर्व तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून एकीशी लग्नसुद्धा केले. दुसऱ्या प्रेयसीवर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत प्रेयसीच्या तक्रारीवरुन प्रियकरावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. अर्जून राजेंद्र कनोजे (३०, रा. कामठी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी जानव्ही (बदललेले नाव) उच्चशिक्षित असून ती एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीवर आहे. तिला २०२० मध्ये क‌ळमेश्वरला भूखंड घ्यायचा होता, त्यामुळे तिने शिवांश नावाच्या मित्राशी संपर्क केला होता. त्याचवेळी आरोपी युवक अर्जून कनोजे हासुद्धा सोबत आला होता. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अर्जून हा एका युनिटी प्रॉपर्टी डिलिंग कंपनीत नोकर होता. मात्र, त्याने कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगून जानव्हीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने विवाहित असल्याची बाब जान्हवीकडून लपून ठेवली.

अर्जूनची नजर जानव्हीच्या गलेलठ्ठ पगारावर होती. त्याने १८ डिसेंबर २०२४ मध्ये रात्री नऊ वाजता त्याने फिरायला जाण्याच्या बहाण्याने जानव्हीला कन्हान-रामटेक रोडवरील व्हिला ओयो हॉटेलवर नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला असता लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. शारीरिक संबंध करताना मोबाईलने जानव्हीचे नग्न फोटो आणि न्यूड व्हिडिओ काढले. त्यानंतर तो वारंवार तिला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठे‌वण्यासाठी बळजबरी करीत होता. त्याला नकार दिल्यास तो सोशल मिडीयावर ‘न्यूड व्हिडिओ’ टाकण्याची धमकी देत होता. तिच धमकी देऊन त्याने जानव्हीच्या पैशातून एक कार विकत घेतली.

अर्जूनचे फुटले बींग

जानव्हीला लग्नाचे आमिष देऊन तो रोज पैसे उकळायला लागला. जानव्ही अचानक त्याच्या घरी गेली असता तो विवाहित असल्याचे समजले. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी त्याचे लग्न झाले असून तिच्यावरसुद्धा तो अत्याचार करीत होता. त्याचे जवळपास १२ तरुणींशी प्रेमसंबंध असून तो पैसे उकळण्यासाठीच प्रेमसंबंध ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब माहिती होताच जानव्हीने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला. मात्र, त्याने अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

प्रेयसीचा गर्भपात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारी २०२५ ला त्याने जानव्हीला शिर्डीला देवदर्शनाला नेले. तेथे लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, तेथे हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. जानव्ही गर्भवती झाल्यामुळे तिने लग्न करण्याची गळ घातली असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच तिला जबर मारहाण केली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. सर्व विसरुन जानव्हीने लग्न करण्याचे ठरविले असता त्याने विरोध करुन तिचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे जानव्हीने कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी अर्जून कनोजे याला अटक केली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी दिली.