भंडारा : काही दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यात एका तरुणाने त्याच्या वाढदिवशी तलवारीने केक कापल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना ताजी असताना भंडाऱ्यात पुन्हा काही तरुणांनी वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याची घटना घडली आहे.

सध्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भंडारा पोलीस तलवारीने केक कापणाऱ्यांचा शोध घेत आहे. वाढदिवस साजरा करताना नवीन काही तरी करून प्रकाशझोतात राहण्याचे फॅड आता वाढले आहे. भंडारा शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कुंतल नामक २२ वर्षीय तरुणाने स्वतःचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.

हेही वाचा – नागपूर : आपण रस्त्यावर पाणीपुरी खाता? मग या दगावलेल्या विद्यार्थिनीबाबत जाणून घा

यावेळी त्याने टेबलवर ठेवलेले दहा केक हातात तलवार घेवून कापले. हा वाढदिवसाचा कार्यक्रम भंडाऱ्याजवळील गणेशपूर इथे गुरुवारी रात्री झाला. यावेळी त्याच्यासह त्याच्या मित्रांनी वाद्याच्या तालावर ठेका धरत तलवारीने केक कापले. या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थितांनी तलवारीने केक कापण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढला.

हेही वाचा – आपला मुलगा सुरक्षित शाळेत जात आहे काय? नागपुरात ७६२ ‘स्कूलबस’कडे योग्यता प्रमाणपत्र नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हाच व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वी २९ मे रोजी मोहाडी तालुक्यातील रोहा या गावात अशाच प्रकारे तलवारीनं केक कापला होता. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी तलवार जप्त केली होती. आता या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.