अकोला: शहरातील एका डॉक्टरने आपल्या राहत्या घरात हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. गजानन सुरेश कुळकर्णी (४०) असे मृतकाचे नाव आहे. आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

जवाहर नगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये गजानन कुळकर्णी हे कुटुंबासह राहत होते. ते बीएचएमएस डॉक्टर असून ते एका शिकवणी वर्गात ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करायचे. मंगळवारी कुटुंबियांना न सांगता ते घरातून रागाच्या भरात निघून गेले. बुधवारी सकाळी ते घरी परतले. पत्नी आणि मुलासह ते घरात होते. दरम्यान, शौचलयामध्ये त्यांनी स्वत:ला कोंडून घेत चाकूने स्वत:वर वार केले. पत्नीने शेजारच्यांच्या मदतीने दरावाजा तोडल्यावर ते रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देताच तात्काळ त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

हेही वाचा… कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानासाठी २२ हजार ३५० शेतकरी अपात्र, यादी प्रसिध्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. सततच्या आजारपणामुळे ते तणावात राहत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी सिव्हिल पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.