चंद्रपूर: पोलीस पाटील व कोतवाल भरतीत ग्रामीण भागात चांगली स्पर्धा बघायला मिळत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथे एकाच पदासाठी पती व पत्नीने मुलाखत दिली. या मुलाखतीत नवऱ्याने परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस पाटील पदभरतीत या जिल्ह्यातील खेडयापाडयात स्पर्धा रंगली आहे. उच्च विद्या विभूषित अनेकांनी या पदाकरिता अर्ज केले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव या गावात नवरा बायकोंनी परिक्षेत बाजी मारली. दोघेही मुलाखतीपर्यत पोहचले.यात मात्र पतीने जास्त गुण मिळवित पद आपल्या नावावर केले.गावातील या पदी आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज भरले. अनेक गावात तर लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्यांनी या पदासाठी अर्ज केले. यावेळी प्रशासनाने स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर पोलीस पाटीलाची परिक्षा घेतली.

हेही वाचा… अमरावती : मोटार वाहन कायद्याचे उल्‍लंघन अंगलट; २३५० वाहनचालकांकडून ३७ लाखांचा दंड वसूल

परिक्षेनंतर मुलाखत द्यायची अनं त्यांत यशस्वी झाल्यानंतर मग पोलीस पाटील पदी निवड होणार अशी रचना होती. लेखी परिक्षेत किमान ३६ गूण मिळविणारा मुलाखतीसाठी पात्र होत होता. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथे पोलीस पाटील पद हे अनु जातीकरिता राखीव होते.या पदाकरिता गावातील एकून ६ उमेदवारांनी अर्ज भरले. ८० गुणांच्या लेखी परिक्षेत किमान ३६ गुण मिळविणे मुलाखतीपर्यत पोहचण्यासाठी आवश्यक होते. पण सहापैकी चार उमेदवारांना कमी गूण मिळाले.

हेही वाचा… महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तांदूळ माफियांची दहशत! तस्कर ‘वीरप्पन’ला अनेकांची साथ; अधिकाऱ्यांनाही धास्ती

कुडेनांदगावातील येथील नवराज चंद्रागडे व प्रतिक्षा नवराज चंद्रागडे हे दाम्पत्य लेखी परीक्षा पास होऊन मुलाखतीपर्यत पोहचले. नुकतीच या पदाकरिता मुलाखत घेण्यात आली.यात नवरा बायकोच्या स्पर्धेत नवऱ्यानेबाजी मारली. पोलीस पाटील पदाकरिता यावेळी गावागावात कमालीची रस्सीखेच बघायला मिळाली. यामुळे प्रशासनानेही अतिशय पारदर्शक पध्दतीने प्रभावी नियोजन केले. गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारीपदी स्नेहल रहाटे यांनी नुकताच पदभार स्विकारला. रहाटे व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मुलाखती घेत उमेदवारांची निवड केली. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत नवरा बायको उत्तीर्ण झाले म्हणून त्यांचे कौतुक होत आहे. शेवटी पद एक असल्यामुळे नवऱ्याची नियुक्ती करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A husband and wife interviewed for the police patil post at kudenandgaon in chandrapur rsj 74 dvr
First published on: 15-07-2023 at 12:53 IST