भंडारा : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, २० जुलै रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ५३ वर भंडारा वन परिक्षेत्रातील कवलेवाडा बीटमध्ये कंपार्टमेंट क्रमांक १७० जवळ घडली.

हेही वाचा – भर पावसाळ्यात नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप, सिग्नलवर पोलीस नाहीत

हेही वाचा – नागपूर : गडकरी, फडणवीस आणि केशवचा चहा; काय प्रकरण आहे वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत बिबट नर असून त्याचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह गडेगाव आगारात हलवला. एनटीसीए एसओपीनुसार शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावली जाईल.