नागपूर : खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलीस आणि वनविभागाला त्याची सूचना दिली.

विकास प्रकल्पांचा फटका वन्यप्राण्यांना नेहमीच बसत आला आहे. अशा प्रकल्पांच्या ठिकाणी बरेचदा वन्यप्राण्यांसाठी ‘मेटीगेशन मेजर्स’ घेतले जात नाही. ते घेतले तरी त्यात त्रुटी असतात. परिणामी वन्यप्राण्यांचा यात बळी जातो. सोमवारी सकाळी घडलेली ही घटना शहराच्या जवळपास घडली. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती की बिबट्याचे शरीर दोन भागात विभागल्यासारखे दिसून येत होते.

हेही वाचा – “अजितदादा तुम्ही खोटं बोलून…”, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आक्रमक; प्रकरण काय? वाचा…

हेही वाचा – मराठा, ओबीसीनंतर आता धनगर समाज आक्रमक; धनगरांच्या भावनांचा उद्रेक झाला तर… आमदार पडळकरांचे सरकारला पत्र

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाेहोचून मृत बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे रेल्वे रुळ परिसरातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात असे दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी अधिकारी आता उपाय शोधत आहेत.