नागपूर : गोरेवाडा परिसरात बिबट्याचा वावर नवा नाही. गोरेवाडा बचाव केंद्र आणि गोरेवाडा प्राणिसंग्रहालय होण्याआधीपासूनच येथे सुमारे १२ ते १४ बिबट्यांनी अधिवास म्हणून हे क्षेत्र निवडले होते, पण हेच बिबटे आता जातायेता नागरिकांना दर्शन देवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकही आता सातच्या आत घरात असे म्हणून अंधार पडण्याआधीच घराकडे धाव घेत आहेत. सोमवारी रात्री एक बिबट्याने चक्क गोरेवाडा जुनी वस्ती जवळच्या सुरक्षा भिंतीवरून चक्क येरझारा घालत होता. गोरेवाडा बचाव केंद्रात बिबट आहेत.

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बिबट्यांची सफारी आहे, पण ज्या गोरेवाडा परिसरात हे प्राणिसंग्रहालय आणि बचाव केंद्र आहे, त्या परिसरात बिबट मोठ्या संख्येने आहेत. गोरेवाडासमोरून भरातवाड्याकडे जाणाऱ्या रोडवर गेल्या काही दिवसांपासून वस्तीतल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे अंधार पडण्याआधीच ते घरी परततात. सोमवारी रात्रीदेखील गोरेवड्याच्या भिंतीवर बिबट येरझारा घालताना नागरिकांना दिसून आला.