scorecardresearch

विवाहित तरुणाने भर रस्त्यात तृतीयपंथीयाला घातली लग्नाची मागणी, नकार मिळताच केले असे की…

मंगेशची तृतीयपंथीयसोबत जवळीक होती. तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे असा त्याने तगादा लावला होता.

विवाहित तरुणाने भर रस्त्यात तृतीयपंथीयाला घातली लग्नाची मागणी, नकार मिळताच केले असे की…
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

वर्धा : लग्नास नकार दिला म्हणून तृतीयपंथीयास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहित युवकास अटक करण्यात आली आहे. मंगेश उर्फ बाळू मनोहर सौरंगपते असे या विकृत युवकाचे नाव आहे.स्थानिक केलकरवाडी निवासी या युवकाची एका तृतीयपंथीयसोबत जवळीक होती. तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे असा त्याने तगादा लावला होता.

मात्र, तृतीयपंथीने त्यास नकार दिला. तुला पत्नी आहे, दोन मुलं आहे त्यामुळे माझा पिच्छा सोडून दे,अशी समजूत काढली.घटनेच्या दिवशी तृतीयपंथी घरी जात असतांना बाळूने रस्त्यात अडविले व लग्नाची मागणी घातली. तृतीयपंथीने नकार देताच त्याने चाकू काढून वार केला. तृतीयपंथीने कसाबसा पळ काढला व काही वेळाने रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्याची तत्परतेने दखल घेत पोलिसांनी आरोपी बाळू ला अटक केली आहे. या प्रेमाची चांगलीच चर्चा होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या