यवतमाळ : कौटुंबिक वादात जावयाने एका मित्राच्या मदतीने दारुड्या मेहुण्याला संपविले. दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मोझर शिवारात १५ दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले. खूनप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.  रमेश विठ्ठल मेटकर (४९, शास्त्रीनगर), राजेश सुभाष गडमडे (३२, रा. मोझर, ता. दारव्हा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर, शंकर चंद्रभान शेलकर (३०, रा. शास्त्रीनगर), असे मृताचे नाव आहे.

शंकरचा २१ जुलै रोजी गळा आवळून खून केल्यावर मृतदेह एका पोत्यात टाकला. सोबतच दोन दगड टाकून पोत्याला तारांनी बाधले. त्यानंतर मृतदेह मोझर शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याची कबुली मारेकर्‍यांनी दिली आहे. मोझर शिवारात पांडे याच्या शेतात असलेल्या विहिरीत पोते होते. नागरिकांनी पोते बाहेर काढून बघितले असता, त्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना २४ जुलै रोजी उघडकीस आली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर अनोळखी मारेकर्‍याविरुद्घ लाडखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा >>> नागपूर : पतीने पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; पाणी भरण्यास सांगितल्याचा राग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृताची ओळख काही केल्या पटत नसल्याने पोलिसांनी एक शोधपत्रिका जारी केली. त्यात मृताच्या वर्णनासह हातावर गोंदलेल्या निकीता व शंकर या नावाचा उल्लेखही करण्यात आला होता. त्या आधारावरच शनिवारी पत्नी निकीता हिच्या सांगण्यावरून ओळख पटविण्यात आली.  स्थानिक गुन्हे शाखा व लाडखेड ठाण्याच्या पथकाने वेगात तपास चक्रे फिरविली. अवघ्या काही तासांत मृताचे नातेवाईक, मित्र, परिवाराची विचारपूस व तांत्रिक पुराव्याचा अभ्यास केला. या प्रकरणात मृताचा जावई रमेश मेटकर याच्यावर संशय बळावला. त्याला विचारपूस केली असता, कौटुंबिक वादातून खून केल्याची कबुली दिली. मोझर येथील मित्र राजेश गडमडे याच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून दिला. मेहुणा व जावयाचे आर्णीत शेजारीच घर होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होत व्हायचे. दोन्ही मारेकर्‍यांना पोलिसांनी अटक केली.