नागपूर : यंदाचा एप्रिल महिना जरा वेगळा आहे. का माहितीये? कारण, दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ आणि आर्द्रता कमी असे विलक्षण आणि विसंगत चित्र या महिन्यात दिसत आहे. हवामानातील या सातत्यपूर्ण बदलांमुळे गेल्या अनेक दशकातील सर्वाधिक थंड आणि आर्द्र महिना ठरला आहे. प्रामुख्याने राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपुरात हा बदल अधिक आहे.

उन्हाळ्यात अवकाळी पाऊस येतो, पण यावर्षी अवकाळी पाऊस हा पावसाळ्यासारखा कोसळत आहे. गेल्या अनेक वर्षातील हा प्रचंड मोठा बदल आहे. साधारण दुपारच्या सुमारास किंवा सायंकाळी गदगडाटी वादळांचा अनुभव नागपूरकरांना आहे. मात्र, यावर्षी ऐन उन्हाळ्यात गडगडाटी वादळांसोबतच सोसाट्याचा वारा आणि गारपीट देखील होत आहे. या महिन्यात सरासरी पर्जन्यमानदेखील १९.९ मिलीमिटर इतके आहे. सापेक्ष आर्द्रता ४७ ते ३२ टक्क्यांच्या दरम्यान आहे. यावर्षीच्या एप्रिलमध्ये पाऊसही अधिक पडला आहे. या महिन्यात दहा दिवसांपेक्षा अधिकवेळा मोठी वादळे आली.

The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

हेही वाचा >>>यवतमाळ बाजार समितींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दे धक्का; पालकमंत्री संजय राठोड व माजी मंत्री माणिकराव ठाकरे गृह मतदारसंघात ‘फेल’

त्यातील तीन दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागात गारपीट झाली. १, ६, ७. ८, २०, २२, २५, २६ आणि २७ एप्रिलला वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तापमानातही यावेळी प्रचंड फरक जाणवला. एप्रिल महिन्यात साधारणपणे शहराचे सरासरी कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस तर महिन्याच्या अखेरीस ४० अंश सेल्सिअस असते. मात्र, १९ एप्रिलचे ४२ अंश सेल्सिअस हे तापमान वगळता बहूतेकवेळा कमाल तापमानाने सुरुवातीपासून चाळीशी ओलांडलेली दिसून आली. सातत्यपूर्ण अवकाळी पाऊस असतानाही कमाल तापमानात फारक फरक दिसून आला नाही. ते चाळीशीच्या आसपासच नोंदवले गेले.