scorecardresearch

नागपूर : ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल…’ असा संदेश पतीला पाठवून चिमुकलीसह आईची तलावात उडी

एका २८ वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह अंबाझरी तलावात उडी घेतली.

drwoned
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

नागपूर : एका २८ वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह अंबाझरी तलावात उडी घेतली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. कल्पना रवी पंडागळे आणि तिची मुलगी स्विटी अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कल्पना मुलीला घेऊन अंबाझरी तलावावर आली. तिने तलावाच्या काठावर बसून मुलीला खाऊ घातले. त्यानंतर पतीला संदेश पाठवून ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल, शेवटी एकदा मुलीचा चेहरा बघायचा असेल तर सांग’, असे कळवले. त्यानंतर तिने मुलीला कडेवर घेऊन पाण्यात उडी घेतली.

हेही वाचा >>> गडचिरोली : दोन नक्षलवाद्यांना अटक; ‘टीसीओसी’च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची कारवाई

 तलावाच्या भिंतीवर उभ्या असलेल्या एका युवकाला ती महिला उडी घेताना दिसली. त्याने तत्काळ नागरिकांना माहिती दिली. अंबाझरीचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांना माहिती मिळताच त्यांनी सहायक निरीक्षक संतोष बोयणे यांना घटनास्थळी पाठवले. तेथे त्यांना एका चिठ्ठीत कल्पनाची आई, पती, आणि भावाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवलेला आढळला. अग्निशमन दलाचे पथक रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 09:11 IST