नागपूर : गोंदिया – कोहमारा हायवेमधील मुर्दोली परिसरात काल रात्री १०-१०:३० च्या दरम्यान क्रेटा कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जख्मी झाला होते. उपचाराकरिता नागपूरला हलवताना वाटेतच वाघाचा मृत्यू झाला. सदर नर वाघ हा नागझिरातील टी १४ वाघिणीचा दोन वर्षांचा निम्नवयस्क बछडा होता.

आज सकाळी पाच वाजतापासून त्याला रेस्क्यू करण्याचे अभियान सुरू झाले. सकाळी ७:३० ला वाघाला जेरबंद करण्यात यश आले. वाघ गंभीर जखमी झाल्याने तो हालचाल करू शकत नव्हता, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पुढील शवविच्छेदन आणि प्रक्रिया नागपूर गोरेवाडा येथे आज दुपारून होणार आहे. बचावादरम्यान वनविभागाचे उपवसंरक्षक प्रमोद पांचभाई , विभागीय अधिकारी अतुल देवकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, सहायक वनंरक्षक राजेंद्र सदगिर, वन परिक्षेत्र अधिकारी रवी भगत, जलद बचाव पथक- नवेगावचे चमू यांचा सहभाग होता.

हेही वाचा – धान्य तस्करीतून पूर्व विदर्भात दरवर्षी हजार कोटींचा घोटाळा? मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मुख्य घोटाळेबाज मोकाट

हेही वाचा – नागपूर : रेशन दुकानात जाता मग धान्यासोबतच मतदार नोंदणीही करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुर्दोली परिसरात नेहमी वाघांचे आवागमन होते, सदर परिसरात हायवेमुळे नेहमी वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात व एखाद्या घटनेत वाघपण जावू शकतात याची आधीच शक्यता वर्तवली होती. सदर रस्ता नागझिरा – नवेगाव कॉरिडॉरमधील पूर्व नागझिरा परिसरातून जातो. तिथे आता लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.