लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) बफरमध्ये सिरकडा येथे छोटी राणी टोपणनाव असलेली आणखी एक वाघीण जखमी अवस्थेत आढळून आली आहे. चार शावकांसह भानुसखिंडी वाघीण तिच्या मागच्या पायाच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरली नसतानाच आणखी एक वाघीण जखमी असल्याचे समोर आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.

जखमी वाघिणीच्या मानेला खोल दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मानेला झालेली दुखापत वायरच्या सापळ्यामुळे असू शकते, असे अभ्यासकांचे मत आहे. ताडोबाच्या बफर झोनमधील गावे तृणभक्षी प्राण्यांना सापळ्यात अडकवण्यासाठी आणि पिकाची नासाडी थांबवण्यासाठी वायरचे सापळे टाकण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना ताडोबात उघडकीस आलेल्या आहेत. दोन वाघांच्या झुंजीतदेखील वाघ जखमी झाला असू शकतो अशी शक्यता आहे.

हेही वाचा…. भाषण न करताही नागपूरमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी अजित पवारच

हेही वाचा…. गडचिरोली : सूरजागड परिसरात खाण माफियांकडून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण! नक्षलपत्रकातील दाव्यामुळे खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ताडोबा बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक तथा त्यांची संपूर्ण टीम या जखमी वाघिणीवर लक्ष ठेवून आहे. पशु वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचे पथक आज सकाळी वाघिणीला बघण्यासाठी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, या वाघिणीला आठ महिन्यांचे दोन बछडे आहेत. ताडोबा प्रकल्पातील अधिकारी व पथक वाघिणीवर लक्ष ठेवून आहेत.