सूरजागड लोहखाणीतील जडवाहतुकीमुळे दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश असताना एका गरीब आदिवासी महिलेवर ट्रक चालकाने ट्रकमध्येच बलात्कार केल्याची संतापजनक घडली आहे. आरोपी लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक असल्याच्या चर्चेने संतापात आणखीनच भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- गोंदिया : रानटी हत्तींच्या कळपाने घेतला शेतकऱ्याचा बळी; एक जखमी

संतलाल जयराम कोठारी (३१, रा. बुरसातकल, ता.गुरुकुंडल, जि.कांकेर, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही २९ सप्टेंबरला दुपारी एटापल्ली येथील बँकेतून निराधार योजनेची रक्कम काढण्याकरता जात असताना एलचील गावानजीकच्या कल्लेम फाट्याजवळ आरोपी संतलाल कोठारी याने एटापल्लीला सोडतो, असे सांगून तिला ट्रकमध्ये बसविले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने कसेबसे अहेरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी संतलाल कोठारी याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आज त्याला अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे प्रकरणाचा तपास करीत आहेत. येलचील परिसरात सुरू असलेल्या चर्चेवरून हा ट्रक सूरजागड लोहखाणीतील वाहतूक करणारा असल्याचे कळते. मात्र, याबाबत पोलीस विभागाकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

हेही वाचा- तब्बल ९ महिन्यानंतर गुरुवारी डीपीसीच्या बैठकीचे आयोजन; उपमुख्यमंत्री व पालकमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

लोहखाणीमुळेे दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांचे हाल

सुरजागड पहाडावरून लोहखनिज उत्खनन करून त्याची चारशे-पाचशे ट्रक आणि टिप्परमधून वाहतूक केली जाते. यामुळे प्रमुख रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याने शेकडो ट्रक धावत असल्याने अनेकदा वाहतूक ठप्प होत असते. शिवाय खड्ड्यांमुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. मागील आठवड्यात अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी ८ ते १० ट्रक जाळले होते. तत्पूर्वी, पहाडावरील लालमाती शेतात वाहून आल्याने पीक उद्धवस्थ झाल्यामुळे एका आदिवासी शेतकऱ्याने महिनाभरापूर्वी आत्महत्या केली होती. या दोन्ही घटना ताज्या असताना आता बलात्कारासारख्या गुन्ह्याची भर पडल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tribal woman was raped by a truck driver in surjagad iron mine in gadchiroli dpj
First published on: 04-10-2022 at 12:56 IST