दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी राऊस अ‍ॅवेन्यू कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल आता १५ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना आज (१ एप्रिल) न्यायालयासमोर हजर केलं. आजच्या सुनावणीवेळी ईडीने न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू हे ईडीकडून न्यायालयासमोर हजर होते. त्यांनी न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. कारण केजरीवालांनी चौकशीत कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर ‘मला माहिती नाही’ एवढंच उत्तर दिलं.

Abhijit Gangopadhyay and Mamata Banerjee
“ममता बॅनर्जी तुमची किंमत किती?”, माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान
hemant soren in supreme court for bail
केजरीवाल यांच्या पाठोपाठ हेमंत सोरेनही सर्वोच्च न्यायालयात ; प्रचारासाठी जामीन देण्याची मागणी
ISIS, five ISIS terrorists, Special court Delhi,
पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा
Supreme Court
‘टेप रेकॉर्डरसारखे काम करू नका’; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयांवर ताशेरे, सरकारी वकिलांबाबतही मांडली ‘ही’ भूमिका
Do Anjali Damania and Suhas Kande have the right to challenge the acquittal Chhagan Bhujbals question in HC
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित
The High Court should not interfere with the rights of the students the Delhi government and the municipal administration should be warned
विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा नको! उच्च न्यायालयाचे दिल्ली सरकार, महापालिका प्रशासनाला खडे बोल
pm narendra modi
मोदींना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; न्यायमूर्ती म्हणाले…
EX Jharkhand CM Hemant Soren Moves sc for bail
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप 

एस. व्ही. राजू म्हणाले, केजरीवाल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनचा पासवर्ड सांगण्यास नकार दिला. त्यांनी इतर कुठल्याही डिजीटल डिव्हाईसचे पासवर्ड दिले नाहीत. ते कुठल्याही प्रश्नाचं योग्य उत्तर देत नाहीयेत. ते केवळ उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर त्यावर ते मैं नहीं जानता (मला माहिती नाही) एवढचं उत्तर देतायत.

हे ही वाचा >> Maharashtra News Live : “रोज नवे जोक, देशात जॉनी लिव्हरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राऊतांचा टोला

दरम्यान, केजरीवाल यांनी तुरुंगात त्यांच्याजवळ भगवद्‌गीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याची परवानगी मागितली. तसेच ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ (How Prime Ministers Decide) हे पुस्तकदेखील त्यांना त्यांच्याजवळ हवं आहे. यासह त्यांनी तुरुंगात धार्मिक लॉकेट परिधान करण्याची परवानगी मागितली. केजरीवालांनी त्यांची औषधं आणि विशेष डाएटची मागणी केली आहे.