बंगरुळ येथून द्राक्षे भरून नागपूर ला येणारा ट्रक समृद्धी महामार्गावरून खाली उत्तरताना बुधवारी सकाळी उलटला. चालू आठवड्यात समृद्धीच्या प्रवेश व्दारावर घडलेल्या तिसऱा अपघात आहे.या घटनेत ट्रक चालक अभिजीत मंडल जखमी झाला.बंगलोर येथून द्राक्षे भरून ट्रक क्र डब्ल्यू बी ६७ सी १३४४ ने समृद्धी महामार्गाने नागपूर ला येत असताना अनियंत्रित होऊन उलटला. ट्रकमधील द्राक्षाचे बॉक्स रस्त्यावर पडले..

हेही वाचा >>>नागपूर : होळी-धुळवडीला ५ हजारजणांवर कारवाई

भशमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे मनोज चौधरी व घनश्याम मानकर ,हिंगणा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अनिल झाडे, संजीव तायडे, शरद कोकाटे ,मुनीम इवनाठे घटनास्थळी दाखल झाले जखमी चालक अभिजित ला तात्काळ एम्स रुग्णालयात हलविण्यात आले.हिंगणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवर पथदिवे मागील १५ दिवसांपासून बंद असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी सांगितले त्यामुळे हे बंद पथदिवे ताबडतोब सुरु करण्याची मागणी होत आहे.