चंद्रपूर: रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख तालुक्याच्या मारलेश्वर देवस्थानातील हा व्हिडिओ आहे. एक माकड आपल्याला चक्क बिसलरीतील पाणी पितांना दिसत आहे. हे दृश्य बघून सर्वानाच कुतूहल वाटले.

काही दिवसापूर्वी वरोरा येथील अरूण उमरे आणि शारदा उमरे यांचे मारलेश्वरला जाणे झाले होते. त्यांनी मंदिरातील दर्शन घेतले. त्यानंतर उमरे कुटूंब तेथील निसर्ग न्याहाळत असतांना चक्क एक माकड त्यांच्याजवळ आले. लक्ष नसताना त्या माकडाने चक्क शारदा उमरे यांच्या जवळची बिसलरी पाण्याची बॉटल हिसकली. जोराचा झटका लागल्याने मागे बघितले असता एक माकड पाण्याची बॉटल घेऊन पळत होते. काहींनी ती बॉटल हिसकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या जिद्दी माकडाने कुणालाही बॉटल दिली नाही.

हेही वाचा… महामार्गांच्या दुभाजकावर झाडे का लावली जातात तुम्हाला माहिती आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे या बॉटलचे माकड काय करते म्हणून सर्वांनाच याची उत्सुकता लागली. त्याने बॉटलचे झाकण व्यवस्थितपणे फोडून उघडले. त्यानंतर पाण्याची बॉटल आडवी केली. अन् पाणी पिऊ लागला. उमरे यांच्यासह उपस्थितांनी या दृश्यला कैद केले. त्यानंतर त्या माकडाने आपल्या परिवारातील सदस्याला बोलाविले. त्यांनीही मनसोक्त पाणी प्यायले. मनाला आनंद देणाऱ्या या दृश्यामुळे उमरे यांना मात्र एक तास पाणी प्यायला मिळाले नाही. त्यामुळे माकडाच्या आनंदातच त्यांनी आनंद मानला.