तरुणीच्या घरात शिरून एका युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुनीत वसंतराव वैद्य (वय 23 वर्ष रा. मोवाड, ता. नरखेड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित तरुणी घरात एकटी असताना आरोपी पुनीत वैद्य तिच्या घरात शिरला. अश्लील चाळे करू लागला. त्यानंतर तिच्यावर बळजबरी केली.

अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढला. त्यानंतर पुनीत हा वारंवार त्या तरुणीच्या घरी यायला लागला. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. असाच प्रकार जुन २०२२ पर्यंत चालत राहिला. तरुणीने या प्रकाराला कंटाळून पुनीत वैद्यला भेटण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता आरोपी युवकाने लग्न करण्यास नकार दिला.

शिवसेनेचा दसरा मेळावा कुणीही हायजॅक करू शकत नाही ; गद्दारांना आदित्य ठाकरेंनी सुनावले

पोलिसात तक्रार केल्यास सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने हा सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. तरुणीने नरखेड पोलीस ठाण्यात आरोपी पुनीत वैद्य या युवकाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलत्काराचा गुन्हा दाखल केला आहे.