अकोला : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकने अपघातग्रस्तांना चिरडल्यामुळे तीन जणांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री बाळापूर-पातूर मार्गावर वाडेगावजवळ घडली.

बाळापूरकडे जात असलेली दुचाकी व विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या दोन्ही दुचाकीवर प्रत्येकी तीन जण स्वार होते. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. नेमके त्याचवेळी दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. या विचित्र अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व तिघे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अमित शहांच्या दौऱ्याचा ‘श्री गणेशा’, अकोल्यातील बैठकीत विदर्भातील सहा मतदारसंघांवर मंथन

हेही वाचा – वकिलीची सनद पाच वर्षांसाठी रद्द, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतांमध्ये अब्दुल सादिक अब्दुल रज्जाक (वय ४३), अब्दुल मजीद अब्दुल सादिक (२९), अब्दुल शोएब अब्दुल खालिद (१४) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये खिरपुरी येथील सक्षम शिरसाट, प्रणव शिरसाट व पवार नावाचा युवक आहे. ते दिग्रस येथे कार्यक्रमाला जात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालय आणण्यात आले. या भीषण अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.