आरोपीला शोधण्यासाठी देवलापार ग्रामीण पोलिसांचे पथक कपिलनगरातील एका इमारतीत गेले. पण पोलीस दिसतात आरोपीने तिसऱ्या माळ्यावरून उडी घेतली. गंभीर जखमी आरोपीचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

शेख इमरान शेख इरफान (२९) असे मृत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मारहाण करून युवकाला इमारतीवरून खाली फेकल्याचा आरोप मृत आरोपीच्या पत्नीने केला. यामुळे या घटनेला वेगळीच कलाटणी मिळाली.

हेही वाचा >>> नागपूर : चिमुकलीने मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातली आणि….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवलापार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात शेख इमरान (कपिलनगर) हा आरोपी आहे. तो  अनेक दिवसांपासून फरार होता.  त्याला अटक करण्यासाठी देवलापार पोलीस रविवारी कपिलनगरात आले होते. त्यांनी  ठाण्यातील काही क्मचाऱ्यांच्या मदतीने शेख इमरानच्या घरी छापा घातला. त्यावेळी शेख इमरान तिसऱ्या माळ्यावर होता. त्याला पोलीस दिसताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग पोलिसांनी केला. मात्र, त्याला जागा न मिळाल्यामुळे त्याने तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला.

पोलिसांनी ढकलल्याचा आरोप

शेख इमरान हे घरी होता. त्याला पोलिसांनी जबर मारहाण केली.  त्याने इमारतीवरून उडी घेतली नसून पोलिसांनी मारहाण केल्यानंतर त्याला खाली फेकले असा, आरोप इमरान यांची पत्नी सबा यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे.