अमरावती: मध्य रेल्वेवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना स्थानकातून, रेल्वेगाड्यांमधून प्रवास करताना अडचणीचे होते. अनेक वेळा तक्रार करूनही फेरीवाले आपले बस्तान हटवत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या फेरीवाला विरोधी पथकाने कायदेशीर कारवाई करून दंड वसुली केली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात एप्रिल ते नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत एकूण ७ हजार २०६ गुन्‍हे दाखल केले असून ७ हजार २०५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून, १ कोटी २९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

हेही वाचा… विदेशी मद्य दुकानांवर वाईन शाॅपचेच फलक ! शासनाच्या अधिसूचनेची पायमल्ली

रेल्‍वे सुरक्षा बलाच्‍या फेरीवाला विरोधी पथकाने १ एप्रिल ते ३१ नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत भुसावळ विभागातील बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ, सामानाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. या पथकाद्वारे फेरीवाला विरोधी पथकाने अनेक एक्स्प्रेसमध्ये तपासणी केली. या पथकाने कलम १३७ अंतर्गत १२ फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरोधात न्यायालयीन कारवाईत करण्यात आली. तसेच फेरीवाल्यांकडून १ कोटी २९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वेच्या रेल्वेगाडी आणि फलाटावर अनधिकृत फेरीवाला आढळून आल्यास प्रवाशांना त्याची थेट व्हाॅट्स ॲपवर तक्रार करता येणार आहे. त्याचबरोबर तिकीट दलाल, संशयित व्यक्तीची माहितीही प्रवासी देऊ शकतात.