चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल व बल्लारपूर तालुक्यातील एकूण ७ गेटेड साठवण बंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून, या योजनांसाठी एकूण ४५ कोटी २४ लक्ष ८१ हजार सहाशे एक्कावन रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल व बल्लारपूर तालुक्यात एकूण ७ गेटेड साठवण बंधारे योजनांच्या मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारीत कामाप्रित्यर्थ रु. ४१ कोटी ७८ लाख ७४ हजार ८५३ रुपये व अनुषंगिक खर्च ३४ लाख ६० हजार ६७९८ रुपये अशा एकूण अंदाजित ४५ कोटी २४ लक्ष ८१ हजार सहाशे एक्कावन रुपये किंमतीस प्रशासकीय मान्यता करण्यात आलेली आहे.

हेही वाचा – नागपूरकरांसाठी मेट्रोची खुशखबर, एक महिन्यासाठी मोफत महाकार्ड

मंजूर करण्यात आलेल्या गेटेड साठवण बंधारे योजनांमध्ये मुल तालुक्यातील चितेगाव, सुशिदाबगाव, आकापूर, ताडाळा व नलेश्वर तसेच बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोठारी व पळसगाव, कोठारी या सात ठिकाणचा समावेश आहे. या योजनांची एकूण साठवण क्षमता ३५५३ स.घ.मी. असून त्यातून १४१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन विषयक महत्त्वपूर्ण प्रकल्‍प व योजना राबविल्‍या आहे. प्रामुख्‍याने बल्‍लारपूर तालुक्‍यात १० गावांना सिंचनाची सोय उपलब्‍ध करणारी पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना, चिचडोह बॅरेज, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्‍या सहा गावांमध्‍ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा, नलेश्‍वर मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या मुख्‍य कालव्‍याचे अस्‍तरीकरण, भसबोरण लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरुस्‍तीचे काम, पिपरीदिक्षीत लघु प्रकल्‍प विशेष दुरुस्‍तीचे काम, जानाळा लघु प्रकल्‍पाची विशेष दुरुस्‍ती, राजोली येथे माजी मालगुजारी तलावाची विशेष दुरुस्‍ती, मौलझरी लघु प्रकल्‍पाची विशेष दुरुस्‍ती, मुल येथील माजी मालगुजारी तलावाच्‍या कालडोह पुरक कालव्‍याची विशेष दुरुस्‍ती, जामखुर्द उपसा सिंचन योजनेची विशेष दुरुस्‍ती, मुल व पोंभुर्णा तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी विशेष बाब या सदराखाली सिंचन विहिरी मंजूर, मुल, चिरोली, दाबगांव, गोलाभूज, राजोली, टेकाडी, डोंगरगांव आदी गावांमधील माजी मालगुजारी तलावाच्‍या विशेष दुरुस्‍तीची कामे आदी सिंचनविषयक कामे पूर्णत्‍वास आणली आहे.

हेही वाचा – वर्धा: प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी आंदोलन; पोलीसांनी आंदोलनकर्त्याला केले स्थानबद्ध

मुल व बल्लारपूर तालुक्यात गेटेड बंधारे मंजूर झाल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्नातून पुन्‍हा एकदा शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्‍ध होणार आहे.